एअरपोर्ट - भाग ५

ओठांवर ओठ हळूच टेकून सुरुवात झाली आणि शेवट ज्यात व्हायचा त्यातच झाला होता. आता जवळ येण्यातली सगळीच अंतरं संपली होती. अर्थातच हे सर्व प्लॅन केलेलं नसल्यामुळे काही प्रोटेक्शन जवळ नव्हतंच. पण आता आम्हाला त्याची पर्वा नव्हती.

मग मी तिच्या कानात म्हटलं, " लग्न कर माझ्याशी.."

"बघू", ती म्हणाली.. झोपाळलेली होती.

लगेच तिला घरी घेऊन जायचं असं मी ठरवलं. पण त्यासाठी रजा कशी टाकणार. मी तिची रजा सँक्शन करीनच. पण माझी कोण करणार?

एकटाच आहे ना मी इथे.. मी हा बेस सोडायचा म्हटला तर फ्लाईट कशा उडणार?

मी माझ्या आईबाबांनाच इथे बोलावून घ्यायचं ठरवलं. मग दिपू आणि मी एकमेकांच्या कुशीत शांत झोपलो.

आणि आज हा सेनगुप्ता म्हणत होता की नोजव्हील जाम आहे म्हणून.. दलबीर का घेऊन गेला तशीच फ्लाईट.. ओव्हर कॉन्फीडन्समुळे जीव घेईल एके दिवशी. हे काय मिग वाटलं का रे तुला थेरड्या.

गोव्यातच जर काही प्रॉब्लेम झाला तर? आणि तिथेही कसंतरी दामटून दलबीरनं विमान परत आणलं तरी इथे लँड झाल्यावरही इश्यू होऊ शकतोच. वाटेत नोजव्हील अजूनच जॅम होऊन बसलं असेल तर? आईस फॉर्मेशन किंवा कशामुळेही ? शिट..!!

मी प्रचंड अस्वस्थ होऊन फ्लाईट यायच्या आधीच कंट्रोल टॉवरमध्ये जाऊन उभा राहिलो.
तिथून विमान दूर असतानाच दिसायला लागतं. रडारवर ब्लीप ब्लीप करून एक ठिपका पुढे सरकत होता.

दूरवर आमच्या विमानाचा निळा फ्लॅश दिसला. मी श्वास रोखून बघत होतो. खरा प्रश्न लँडिंग नंतरच होता. मला एकदम काहीतरी विचित्र व्हायला लागलं. मी रनवेकडे पळत सुटलो. अर्थातच तिथल्या एका कॉर्पोरलनं मला अडवलं, " अरे सरजी जहाज लँड हो रहा है. मत मारी गयी है आप की? "

मी तसाच तडफडत रनवेजवळ उभा राहिलो. विमान रनवेला टच झालंसुद्धा. नंतर नोजव्हील वळत नसल्याचं मला दिसलं. म्हणजे आता विमान जरा जरी वाकड्या दिशेत वळलं तर सरळ कुठेतरी रनवे बाहेर जाउन क्रॅश होणार होतं. जितका शक्य आहे तितका रडर पेडलचा वापर करून विमानाचं नाक समोर ठेवायचं हे करायला लागणार होतं. पण एकदा व्हील वळलेल्या अवस्थेत जाम होऊन बसलं असतं तर अवघड होतं.

मी मनानं ती फ्लाईट चालवत होतो. यावर उपाय एकच होता की लँड होतानाच अगदी सरळ नाकासमोर रनवेच्या मध्य रेषेवर टचडाऊन करायचा आणि स्पीड कमी होईपर्यंत सरळ जात राहायचं रनवे न सोडता. दलबीरनं नेमकं तेच केलं होतं आणि सरळ रेषेत तो भरधाव निघाला होता. जरा वेळाने विमान थांबलं आणि मग मी मोठ्ठा श्वास बाहेर सोडला. आम्ही रनवे वरच विमान मोकळं केलं. गुत्तानं मग टो करून ते आत आणलं असणार.

या सगळ्यामुळे मी एक मात्र सुरु केलं की मी रोज दिवसरात्र एअरपोर्ट मधेच रहायला लागलो. माझ्या टूलरूम मध्ये. तिथूनच सगळं काम. झोपेचं प्रमाण वाढलं होतं. पण असं करून चालणार नव्हतं. सतत अलर्ट राहणं हे विमानाच्या सुरक्षित सर्विसिंग आणि मेंटेनन्स साठी एकदम आवश्यक होतं. तिथे राहायला परवानगी नव्हती पण मी तसाच घुसून बसायचो. मग गार्डस काही बोलायचे नाहीत.

दिपूशी लवकरात लवकर लग्न करायचं असं मी ठरवलंय. ती त्या नोजव्हील प्रकरणाच्या दिवशी रनवेवरच विमानातून उतरताना मला दिसली. दलबीरनं मोठ्ठा क्रॅश वाचवला होता. मी तिला जाऊन मिठीत घेतलं घट्ट. मग मला कोणीतरी मागे ओढून घेतलं.

आता ती मला इथेच भेटते. टूलरूममध्ये. "हाय" करून स्माईल देउन जाते ड्यूटीवर. कधी कधी गप्पा मारत पण बसते वेळ मोकळा असला की. हातात हात घेऊन. मलाच वेळ नसतो.. मी सकाळी विमान आलं की हातातलं काम टाकून आधी त्याचं नोजव्हील बघतो. रॉड सारखा मोठा आर्म लावून ते व्हील नीट रोटेट होतंय ना ते बघतो. हो..चान्स नाही घ्यायचा परत. जाम वाटलं तर गुत्ताच्या मानगुटीवर बसतो की ग्रीस घाल, ग्रीस घाल म्हणून.. सोडतच नाही घालेपर्यंत.

--
नचिकेत गद्रे
ngadre@hotmail.com

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.