दिवाळी सुडोकू

कोडे सोडवायच्या अटी:
कोड्याच्या चौकटीत काही पणत्या दिल्या आहेत. यातील प्रत्येक पणतीवर आपल्याला एकेक फुलबाजी पेटवायची आहे. एखाद्या पणतीवर फुलबाजी पेटविण्यासाठी ती फुलबाजी त्या पणतीच्या वरच्या, खालच्या, उजवीकडच्या, किंवा डावीकडच्या घरात ठेवावी लागेल. एका पणतीवर एकापेक्षा जास्त फुलबाज्या पेटविता येणार नाहीत. चौकटीच्या एका घरात फुलबाजी ठेवली असता, त्या घराच्या सभोवतालच्या कोणत्याही घरात दुसरी फुलबाजी ठेवता येणार नाही. चौकटीच्या उभ्या किंवा आडव्या ओळींत किती फुलबाज्या ठेवता येतील याची संख्या त्या ओळींसमोर दिली आहे.
आधी नमुन्यादाखल दिलेले कोडे त्याच्या उत्तराच्या मदतीने सोडवून बघा. कोडी सोडवायच्या अटी लक्षात आल्यावर मग खालील कोडी सोडवा. कोड्यांची उत्तरे आम्हाला पाठवायची नसली तरी सुद्धा कोडी सोडवून बघा. उत्तरं इतरत्र दिली नाही आहेत, कारण आम्हाला खात्री आहे की तुम्हाला ही कोडी नक्की सुटतील.
टीप: कोडे सोडवताना ज्या घरांत फुलबाजी येणार नाही हे नक्की असेल, त्या घरांत फुल्ली काढून घ्या. म्हणजे कोडे झटपट सुटेल. उदाहरणासाठी दिलेले कोडे पहा.
खालील दोन्ही कोडी उदाहरणासहीत कृष्णधवल व रंगीत अशा दोन्ही आवृत्तींमधे डाऊनलोडींगसाठीही उपलब्ध आहेत.


या चित्रावर क्लिक केल्यास दिवाळी सुडोकूची कृष्णधवल आवृत्ती डाऊनलोड करता येईल.
एकूण डाऊनलोड्स: 32
एकूण डाऊनलोड्स: 32

या चित्रावर क्लिक केल्यास दिवाळी सुडोकूची रंगीत आवृत्ती डाऊनलोड करता येईल.
एकूण डाऊनलोड्स: 34
एकूण डाऊनलोड्स: 34
--
अपर्णा मोडक
sudomu@gmail.com
(संकलक)

0 comments:
टिप्पणी पोस्ट करा