सूचना आणि सल्ले
या अंकातील एखादी लिंक उघडत नसेल किंवा एखादा साहित्यप्रकार वाचण्यास अडचण येत असेल तर आम्हाला अवश्य सांगा.
तसंच, आपल्याला इतर कोणत्याही प्रकारचा सल्ला अथवा सूचना द्यावयाची असल्यास इथे अवश्य लिहा.
धन्यवाद.
मोगरा फुलला ई-दीपावली अंक समूह
तसंच, आपल्याला इतर कोणत्याही प्रकारचा सल्ला अथवा सूचना द्यावयाची असल्यास इथे अवश्य लिहा.
धन्यवाद.
मोगरा फुलला ई-दीपावली अंक समूह
12 comments:
नमस्कार ,कांचनताई !
दोन मला महत्वाच्या वाटणार्या सुचना आहेत.
१ }तुम्ही दीपावली अंकाचा जो विजेट कोड आता दिला आहे,त्यात थोडी चूक झाल्यामुळे अंक उघडत नाही. विजेट कोड मध्ये दिलेली लिंक - hhttp://mfdiwaliank.blogspot.com/ अशी आहे. एक h जास्त पडला आहे.
२} अंकामध्ये ’प्रतिक्रिया देण्यासाठी मराठीतून टंकलेखनाचा पर्याय उपलब्ध आहे ’ - हा पर्याय एक तर काम करत नाही , किंबहूना मला तरी कळले नाही कसा वापरायचा , मी खालचा पर्याय + बरहा वापरले .
सदीच्छा !
- समीर पु.नाईक
प्रथम सुचना ही G-Buzz वर दिलेल्या कोड संदर्भात आहे,
क्षमस्व !
- समीर पु.नाईक
समीर,
खालचा जो पर्याय आहे तोच मराठी टंकलेखनाचा पर्याय आहे. आणि तो बराहा चा नाही क्विलपॅडचा पर्याय आहे. :-)
मी Buzz वरील चूक सुधारली आहे. दोन्ही प्रतिक्रियांसाठी आभार.
एखाद्या लेखावर इतर लोकांनी दिलेले अभिप्राय दिसत नाहीत.
ते दिसण्यासाठी काय करता येईल ?
ब्लॉंगर व्यतिरिक्त इतर लोक आपला प्रतिसाद कसा देऊ शकतात ? व तो सर्वाना वाचावयास कसा मिळतो ?
नमस्कार अनामित,
एखाद्या लेखावर दिलेल्या प्रतिक्रिया वाचण्यासाठी ब्लॉगचं संपूर्ण पेज स्क्रोल करून वाचावं लागतं, म्हणजे प्रतिक्रिया आपोआप दिसतात आणि वाचताही येतात. लेखाच्या शेवटी किती प्रतिक्रिया आल्या आहेत, त्याचा आकडा डावीकडच्या कोपर्यात स्पष्टपणे लिहिलेला असतो. जर प्रतिक्रिया मिळालेल्या नसतील, तर 0 Comments असं स्पष्टपणे नमूद केलेलं असतं. ते वाचलं की समजतं. या पोस्टखाली दिलेली स्वत:ची प्रतिक्रिया जर आपल्याला स्वत:ला वाचता येत असेल, तर इतर लेखांखाली मिळालेल्या प्रतिक्रिया आपल्याला वाचता यायलाच हव्यात. अन्यथा ताज्या प्रतिक्रिया वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अनामित,
ब्लॉग व्यतिरिक्त प्रतिक्रियांसाठी संपर्क म्हणून दिलेला ईमेल आयडी वापरा. तो इथेच दिला आहे. उजवीकड्च्या साईडबार्समधे शोध घ्या.
धन्यवाद.
अंक सुंदर झालाय यात काही वादच नाहीये...त्याच बाह्यरूप आणि अंतरंग दोन्ही छान....तुझी क्रिएटीव बाजू पुन्हा एकदा चमकतेय....
फक्त एकाच सूचना मी खर म्हणजे कथा आणि कविता हे प्रकार फारसे वाचत नाही..पण दिवाळी अंक असेल तर सगळच चाळल जात...मला वाटत असे फक्त भाग एक वगैरे सर्वसाधारण दिवाळी अंकात देत नाहीत न?? की मी चुकून अर्धीच कथा वाचायला घेतली की आणखी काही गैरसमज.....
कळावे लोभ असावं आणि सगळ्या टीमच पुन्हा एकदा अभी आणि नंदन....
अपर्णा, प्रशंसोत्गारांसाठी आभार.
भाग १ जिथे संपतो आहे, तिथे खालीच सुहासच्या आयडीजवळ पान १ व २ उपलब्ध आहे ना. जर २ वर क्लिक केलंस तर पुढचा आणि शेवटचा भाग वाचता येईल. या दिवाळी अंकात कुठलीच कथा क्रमश: नाही केवळ कथेच्या लांबीनुसार, वाचकांना नॅव्हिगेशन सोपं जावं म्हणून भाग पाडले आहेत
मी माझया मै त्रिणी च्या लेखा वर comment दिली होती. ती तिला दिसत नाहीये. काय क रावे लागेल मला ?
या अंकावरील प्रत्येक प्रतिक्रियेची नोंद होते आहे. तुम्ही प्रतिक्रिया दिलीत, ती पोस्ट झाली नसावी कारण माझ्याकडे तशी नोंद आलेली नाही. तुमच्या मैत्रीणीचा लेख कुठला हे सांगण्याची तुम्ही तसदी घेतलेली नाही, त्यामुळे शोधू शकत नाही. तुम्हाला पुन्हा प्रतिक्रिया द्यावी लागेल.
मोगरा फुलला चा अंक खूप सुंदर आहे
या ब्लॉग चा जे ओळखचिन्ह किंवा फॉण्ट आहे तो कॅलिग्राफी ने manualy बनवला असता तर फार सुंदर दिसला असता.
टिप्पणी पोस्ट करा