उल्हास भिडे
नमस्कार,
माझ्याबद्दल थोडेसे.
मी उल्हास रामचंद्र भिडे. जन्मापासून मुंबईत राहतो. गेल्या काही वर्षांपासून मुंबई-बोरीवली इथे स्थायिक. महानगरपालिकेच्या संगणक विभागातून निवृत्त. एक सामान्य माणूस. विधात्याने जे आयुष्य दिलं आहे, ते मला आनंदात, खेळकरपणे जगायला आवडतं.
साधारण अडीच-तीन वर्षांपूर्वी Orkut वरील ‘Zee मराठी’ आणि ‘असंभव विथ सतीश राजवाडे’ या communities मधून माझ्या Social networking ला सुरवात झाली. तिथे चालणार्या चर्चेत नियमित भाग घेत असल्यामुळे अनेक लोकांशी परिचय झाला. ‘मराठी मालिकांमधल्या पात्रांचे उखाणे’ तसच असंभव मालिकेतील पात्रांची कविता स्वरूपात ‘मनोगते’ मी संबंधित Orkut communities वर लिहिली. माझ्या लेखनाला लोकांची दाद मिळाली आणि त्यामुळेच माझ्यातील कविता करण्याचा सुप्तगुण जागृत झाला. (म्हातारपणात बाळसं :D). मला प्रोत्साहित करणार्या सर्व नेट मित्रांचा मी ऋणी आहे. मी माझं लेखन कुठेतरी एकत्र स्वरूपात संग्रहित करावं, असा आग्रह माझ्या काही net friends नी केल्यामुळे माझा ब्लॉग आकारास आला. विशेष म्हणजे ब्लॉगचं, ’संचित’ हे नामकरण देखील माझ्या एका net friend नेच केल आहे.
आपले विचार व्यक्त करायला, आवडीच्या विषयांवर चर्चा करायला social networking हे एक उतम साधन आहे. दर्जेदार मराठी ब्लॉग्स वाचणं, त्यातील लेखनावर प्रतिसाद देणं या गोष्टींचा अंतर्भाव Orkut, FB, Chatting याबरोबरीने माझ्या social networking मध्ये सहजगत्या झाला. या माध्यमातून अनेक मित्र जोडले गेले, अनेकांमधल्या गुणांचा परिचय झाला. Social networking हा माझा छंदच नव्हे तर जीवनाचा अविभाज्य भाग कधी बनला हे माझं मलाच कळल नाही.
--
उल्हास भिडे
ulhasbhide@yahoo.co.in
उप-संपादक
मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१०

4 comments:
उत्साह असावा तर असा!!! तुमचे नेटवर्क आणि लिखाण असेच बहरत राहो... दिवाळीच्या शुभेच्छा :)
भिडेकाका, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा...तुमची मेहनत दिसून येतेय...
आणि हो अंक खूप खूप आवडला.... :)
सौरभ, सुहास
धन्यवाद !
तुमच्यासारख्या नेट-मित्रांच प्रोत्साहन हाच उत्साहाचा उगम आहे.
सर्वांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
‘मोगरा फुलला’ वरचा तुमचा आजवरचा लोभ, अंकासाठी साहित्य पाठवून अनेकांनी घेतलेला प्रत्यक्ष सहभाग, संपादक मंडळाने कांचनच्या कुशल नेतृत्वाखाली पार पाडलेली जबाबदारी, तसंच असंख्य जाल-मित्रांच्या सदिच्छा; या सर्वाच फलित म्हणजे हा आपला ’मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१०’.
इतका सारा पाठिंबा असल्यामुळेच मी माझा खारीचा वाटा उचलू शकलो.
लोभ आहेच, तो वृद्धिंगत व्हावा.
...... उल्हास भिडे
टिप्पणी पोस्ट करा