मैत्री

मैत्री एक टॉनीक की अजब रसायन !

मनान मरगळलं की लोहाची ताकद देणारी,
मन खचल तर पांढऱ्या पेशींसारख
लढायच बळ देणारी!

वय, रंग, रूप, ज्ञान आणि पैसा
या भेदांच्या पलीकडे जाऊन
निरपेक्ष प्रेम करणारी!

हिच्यात नाही द्वेष आणि स्पर्धा
गुण दोषांना सामावून घेत आपलस करणारी,
एकीला खुपलं तर दुसरीच्या डोळ्यात पाणी आणणारी,
यश मिळाल तर प्रेमाने शुभेच्छा देणारी!

दमून भागून आलेली दिसली तर
आईच्या प्रेमानं खाऊ घालणारी
आजारी पडल तर धावत येऊन
गरम चहा करुन देणारी !

कधी अतिशय कठोर तर कधी अगदीच भावुक होणारी
झालच चुकून रागवण तर तेही समजून घेणारी !

अशी ही मैत्री बाजारात नाही विकत मिळत, टॉनीक सारखी
नशीबात असेल तरच मिळते, मातीतून फ़ुटलेल्या अंकुरासाखी !

--
प्रा. कांचन शेंडे
kshende.63@gmail.com

4 comments:

Unknown २ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:२९ PM  

ashi maitri pratyekala havich!
sheetal pasalkar, sp college.

अनामित,  २ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:३६ PM  

MATRICH RUP KHARACH VEGALA AHE..................

KAVITA SUREKH AHE........


SHRIKANT GABALE

pranay ६ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:१८ PM  

मैत्री म्हणजे माणसाच्या आयुष्यातील अनमोल ठेवा आणि ह्याचे खूप सुंदर शब्दात वर्णन केले आहे तुम्ही

अनामित,  १५ नोव्हेंबर, २०१० रोजी १:४५ PM  

मैत्री हे अजब रसायन आहे खरी पण मातीतल्या फुटलेल्या अंकुराची उपमा
रास्त वाटते.
कविता खूप खूप आवडली.

विलीना.

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.