मोगलाई पराठा चाट
नग: ३
साहित्य:
२ वाट्या मैदा, ३ बटाटे, बेसन, पीठ, कोथिंबीर, कांदा, दही, डाळींबाचे दाणे, बारीक शेव, खजुर चिंचेची पेस्ट, आवडत असल्यास चीज.
कृती:
मैदा थोडे पाणी घालून मळून घ्यावा. मळलेल्या गोळ्याची फुलक्याच्या आकाराची पोळी लाटुन घ्यावी. नंतर त्याला थोडे तुप लावुन त्याची सुरळी करुन घ्यावी. कडबोळ्याच्या आकारात करुन दाबुन परत लाटावे म्हणजे नंतर त्याला छान पदर सुटतात. नंतर तव्यावर मंद आचेवर तेल सोडून दोन्ही बाजुने तो पराठा खरपुस भाजून घ्यावा.
एका बाजुला बटाट्याची उकडुन, कस्करुन, बिना तेलाची भाजी करुन घ्यावी.गोळा करुन घ्यावा. तो गोळा त्या पराठ्यावर थापुन घ्यावा. त्यावर बेसन पिठाची पेस्ट बाइडींग करुन लावावे. नंतर परत एकदा खरपुस भाजुन घ्यावे. तयार झालेल्या पराठ्यावर आता खजुर-चिंचेची पेस्ट पसरावी, बारीक चिरलेला कांदा पसरुन घालावा. थोडे दही पसरावे, कोथिंबीर,बारीक शेव आणि शेवटी डाळींबाचे दाणे घालुन सजवावे. आवडत असल्यास वरुन थोडे चीज किसून घालावे.
--
पल्लवी कुलकर्णी
pallavikularni@gmail.com

इतर पाककृती:
2 comments:
चाट अतिशय आवडता प्रकार ...धन्यवाद :)
मलाही चाट प्रकार खूप आवडतो...आता हा प्रकार ही करून पाहिन... भारी दिसतो आहे फोटो मधे..
पियुषा
टिप्पणी पोस्ट करा