शाश्वत

खळाळते जलतरंग सुंदर
स्वरलहरींचे मोती उधळत
कणाकणातुन छेडित येती
स्वर्गीचे संगीत अनाहत

दुग्धधवल धारांचे नर्तन,
हिरवे-काळे कातळ उजळत
रुद्रजटेतिल गंगेसम ते
भव्य-दिव्य सौंदर्य अनवरत

हिमकण जैसे तुषार झेलुन
पर्णपाचुचे किरण चकाकत
इंद्रधनूची रंगसंगती
लेवुन वृक्षलताहि सुशोभित

अमोघ अस्त्रापरी कोसळे
तो घनघोर प्रपात अखंडित,
स्तंभित अन नि:शब्द उभी मी,
अशाश्वतातिल शाश्वत शोधत!

--
क्रांति साडेकर
krantisadekar@gmail.com

6 comments:

Unique Poet ! १ नोव्हेंबर, २०१० रोजी १०:४० AM  

क्या बात है ! ’ स्तंभित आणि नि:शब्द उभी मी , अशाश्वतातिल शाश्वत शोधत !’ - हे फार सुंदर !

Suresh Shirodkar ११ नोव्हेंबर, २०१० रोजी १०:५५ PM  

क्या बात है!! अतिशय सुंदर कविता.

तुझ्या दोन्ही कविता फारच सुंदर आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.