स्वरांकिता
अष्टदशके स्वरालयाची
अवीट मधाळ सुरावटीची
मुग्धता ती रसिकांची
तृप्त केली सुरश्रीनी
काव्यातील भावशब्दांना
कोंदण सुर माधुर्याचे
भावनांची ती उत्कटना
रसाळ गीतांतुनी उमटे
ताल लयीच्या वर्षावानी
भाव कवीचे जाणविती
संगीताच्या हिंदोळ्याची
नादती स्पंदने अंतरी
कंठातील मधुर झरा
भुवनी अक्षय वहावा
अखंडतेने झुळझुळावा
हीच रसिकांची मनिषा
--
मिलिंद कल्याणकर
dershan@rediffmail.com
1 comments:
dhanyawaad
टिप्पणी पोस्ट करा