कूट चारोळ्या

"कूट कविता" हा फार जुना काव्य प्रकार आहे. श्री विठ्ठल नावचे एक जुने कवी होऊन गेले. त्यांनी रुळवलेला हा प्रकार पुढे श्री. पुरुषोत्तम हरिहर जोशी यांनी सुरु ठेवला. उदाहरण म्हणून श्री. पुरुषोत्तम हरिहर जोशी यांचीच रचना पुढे दिली आहे व त्यानंतर आणखी एक उदाहरण म्हणून माझी एक रचना देत आहे:

पहिले उदाहरण:
आद्याक्षरारहित तो इस्लामी संत
मध्याक्षरारहित ते नाते पसंत
अंत्याक्षरारहित तस्कर ना म्हणावे
सर्वाक्षरा मिळुन ते उजेडी पहावे
- पुरुषोत्तम जोशी

इस्लामी संत = वली
नाते पसंत = साली
तस्कर म्हणजे चोरच्या विरुद्ध = साव
उजेडी पहावे = सावली
उत्तर = सा व ली


दुसरे उदाहरण:
पहिला दुसरा रानटी बैल
दुसरा तीसरा घाव खोल
आध्य अंत्य गाभा, गीर
सर्वाक्षरी अशी भाजी चीर

रानटी बैल = गवा
घाव = वार
गाभा, गीर= गर
उत्तर = ग वा र


आता पुढील दोन चारोळ्य़ांचं अचूक उत्तर शोधा पाहू.


१.
मध्याक्षर खाता अर्क असे
आद्याक्षर वगळता वधू नसे
अंत्याक्षर चोरता चोरही नसे
सर्वाक्षरी एक झाड असे


२.
आद्याक्षरारहित तळकट खाद्य
अंत्याक्षरारहित आलिंगन
मध्याक्षरारहित पहाड़ शिखर
सर्वाक्षरा मिळुन पाखरू सुंदर

--
सुरेश शिरोडकर
skarsuresh@gmail.com

4 comments:

Shreya's Shop १ नोव्हेंबर, २०१० रोजी २:५९ PM  
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
Shreya's Shop १ नोव्हेंबर, २०१० रोजी ३:०२ PM  

पहिल्या चारोळीचे उत्तर "सावरी"

Shreya's Shop १ नोव्हेंबर, २०१० रोजी ३:०४ PM  

दुसर्‍या चारोळीचे उत्तर "कवडा"

Suresh,  २ नोव्हेंबर, २०१० रोजी १०:१४ PM  

अरे वा !!
श्रेयाचा पक्षी फडफड करायला पण लागला

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.