प्रणयगंध

मदनरंग मेंदीचा उधळित ये प्रणयगंध
प्रीतबंधनी गुंतुन मन गाई मुक्तछंद

फुलुन येत अधिर चित्त, शकुनगीत गुणगुणते
बिलवर, कंकण करांत, नूपुर पदि रुणझुणते
मधुर स्वप्न जागविती हे नवे ऋणानुबंध

लाजत मुरडत येइल नाव सख्याचे ओठी
भावफुलांची माला घालिन श्यामल कंठी
गात्रसतारी कंपित, छेडतील धून मंद

सात पावलांत उरे माझे मीपण मागे
विरले त्याच्यात पुरी, गुंफून मंगल धागे
भुलवी मनभ्रमराला प्रेमफुलांचा मरंद

हळदमाखले पाउल उंब-यात अडखळते
मायेच्या अंगणात कातर मन घुटमळते
पदरी घेते भरून आठवणींचा सुगंध

--
क्रांति साडेकर
krantisadekar@gmail.com

4 comments:

Suhas Diwakar Zele ४ नोव्हेंबर, २०१० रोजी २:१९ PM  

वाह..मस्तच झाली आहे. आवडली

क्रांति ८ नोव्हेंबर, २०१० रोजी ९:१६ PM  

धन्यवाद मंदार आणि सुहास.

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.