उंबरठा
चाळीशीच्या उंबरठ्यावर उभी असताना,
संसाराचा सारीपाट मी खेळीते.
मुलांबाळांमध्ये रमत असताना,
आयुष्याचे विविध रंग मी वेचिते.
माजघराकडे वळून बघताना ,
नजर माझी खिळून राहिली.
चूल-बोळकी, खेळणं-पीठ,
लहान बाहुली खुणावु लागली.
काच-कवडी,जिबली ,फ़ुगडी,
उड्याची दोरी,घातली लंगडी.
बाहुला-बाहुलीचे लग्न लावले,
व-हाडी जमले मित्र सारे,
वाजंत्री वाजली,जिलेबी खाल्ली,
रुसवा-फ़ुगवा झाला देखावा,
विहिण रुसली,व्याही हसले,
अखेर नवरी तुमचीच म्हटली
भांडणे मिटली, खेळ संपला,
बघणारी सारी हसत राहिली
हसतात तर हसू दे
बघतात तर बघू दे
चाळीशीच्या उंबरठ्यावर उभी असताना
संसाराचा सारीपाट खेळ खेळताना
आई, काकी, मामी, आत्या
सुरेख नाती निभावता निभावता
आयुष्याचे विविध रंग वेचताना
दिवाणखान्याकडे नजर वळली
बॉयकट, शॉर्ट मधली लेक माझी
नेलपेंट लावत एम.टी.व्ही बघत होती,
कॉम्प्युटर, मोबाईल हाताळत होती,
ट्युशन व्यक्तिमत्व शिबीरात रमत होती,
अभ्यासाच्या ओझ्याखाली मेरीट मध्ये येत होती,
नविन विचार करत होती,
स्वातंत्र्य आपले जपत होती.
पण बालपण आपले विसरत होती.
बालपण विसरता हसत होती
हसता हसता म्हणत होती,
“किरण, ऐश्वर्या, कल्पना
आदर्श आहेत आम्हाला
स्वावलंबी बनतो आहोत
जागृत जीवन जगत आहोत.
ना कुणाची भिती आम्हां
ना कुणाची तमा आम्हां
समतेचे हे वारे वहाते
आम्हांस कुणी न कमी लेखणे
खांद्यास खांदा भिडवुनी
पाऊल आमचे पडती पुढे
रक्षक या भक्षक समाज,
आम्हीं ना नतमस्तक तयास
चिरडूनी या फ़ाडूनी टाकीन,
दोन हात सत्वरी दावीन
अबला न आम्ही सबला नारी"
या देशाची शान वाढवी
संस्कृतीचे स्मरण करता,
सहनशीलतेचे धडे गिरविते
उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी
उंबरठ्यावरचे माप ओलांडते
उंबरठ्यावरचे माप ओलांडते...
--
पल्लवी कुलकर्णी
pallavikularni@gmail.com
संसाराचा सारीपाट मी खेळीते.
मुलांबाळांमध्ये रमत असताना,
आयुष्याचे विविध रंग मी वेचिते.
माजघराकडे वळून बघताना ,
नजर माझी खिळून राहिली.
चूल-बोळकी, खेळणं-पीठ,
लहान बाहुली खुणावु लागली.
काच-कवडी,जिबली ,फ़ुगडी,
उड्याची दोरी,घातली लंगडी.
बाहुला-बाहुलीचे लग्न लावले,
व-हाडी जमले मित्र सारे,
वाजंत्री वाजली,जिलेबी खाल्ली,
रुसवा-फ़ुगवा झाला देखावा,
विहिण रुसली,व्याही हसले,
अखेर नवरी तुमचीच म्हटली
भांडणे मिटली, खेळ संपला,
बघणारी सारी हसत राहिली
हसतात तर हसू दे
बघतात तर बघू दे
चाळीशीच्या उंबरठ्यावर उभी असताना
संसाराचा सारीपाट खेळ खेळताना
आई, काकी, मामी, आत्या
सुरेख नाती निभावता निभावता
आयुष्याचे विविध रंग वेचताना
दिवाणखान्याकडे नजर वळली
बॉयकट, शॉर्ट मधली लेक माझी
नेलपेंट लावत एम.टी.व्ही बघत होती,
कॉम्प्युटर, मोबाईल हाताळत होती,
ट्युशन व्यक्तिमत्व शिबीरात रमत होती,
अभ्यासाच्या ओझ्याखाली मेरीट मध्ये येत होती,
नविन विचार करत होती,
स्वातंत्र्य आपले जपत होती.
पण बालपण आपले विसरत होती.
बालपण विसरता हसत होती
हसता हसता म्हणत होती,
“किरण, ऐश्वर्या, कल्पना
आदर्श आहेत आम्हाला
स्वावलंबी बनतो आहोत
जागृत जीवन जगत आहोत.
ना कुणाची भिती आम्हां
ना कुणाची तमा आम्हां
समतेचे हे वारे वहाते
आम्हांस कुणी न कमी लेखणे
खांद्यास खांदा भिडवुनी
पाऊल आमचे पडती पुढे
रक्षक या भक्षक समाज,
आम्हीं ना नतमस्तक तयास
चिरडूनी या फ़ाडूनी टाकीन,
दोन हात सत्वरी दावीन
अबला न आम्ही सबला नारी"
या देशाची शान वाढवी
संस्कृतीचे स्मरण करता,
सहनशीलतेचे धडे गिरविते
उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी
उंबरठ्यावरचे माप ओलांडते
उंबरठ्यावरचे माप ओलांडते...
--
पल्लवी कुलकर्णी
pallavikularni@gmail.com
1 comments:
एक नंबर......
पियुषा
टिप्पणी पोस्ट करा