शुभेच्छा संदेश
उदय सबनीस

तू हे काही वेगळेच करते आहेस, छान करते आहेस. मागे मी ई सकाळ साठी मी गुलजारजींच्या कवितांचे वाचन केले होते. माझ्या शुभेच्छा तुझ्याबरोबर कायमच आहेत परंतु माझ्या आवाजाचा जर तुला काही वापर करता आला तर मला अधिक आनंद होईल. पुन्हा एकदा तुझ्या दिवाळी अंकासाठी तुला खूप खूप शुभेच्छा.
सस्नेह,
सॅबीदा

प्रमोद देव

मोगरा फुललाच्या ह्या दिवाळी अंकाला माझ्या हार्दिक शुभेच्छा! ह्या मोगर्याचा सुगंध उत्तरोत्तर संपूर्ण महाजालावर पसरत जावो अशी मनोकामना व्यक्त करतो. तथास्तु! कांचन तू हो पुढे, आम्ही आहोतच तुझ्या बरोबर !
तुझा स्नेहांकित,
देवकाका
