पहिले चुंबन
अधीरतेने आज गायिले, थरथरणार्या अधरद्वयाने
शृंगाराच्या मैफिलीतले, पहिले वहिले गीत मुक्याने
सर्वांगी मोहरला काटा, गात्री गात्री गोड शहारे
घुसमटलेल्या श्वासांमधुनी, सतार मनि झिनि झिनि झंकारे
अमृत गोडी अनुभवण्याचे, भाग्य प्रथम अधरांस लाभता
असुयेने हिरमुसून रसना, करी शब्द ना धरी मौनता
या ओठांना त्या ओठांचे, शब्दाविण संवाद उमगले
अर्धोन्मीलित नेत्रांमधुनी, परस्परांनी भाव वाचले
--
उल्हास भिडे
ulhasbhide@yahoo.co.in

12 comments:
छान आहे कविता. ह्यापूर्वी आपल्या जालनिशीवर वाचली होती..तेव्हाच ह्याला चाल लावली होती...पण काही कारणाने मी विसरून गेलो होतो...आता इथे वाचल्यावर आठवलं सगळं. आपण ही चाल खालील दुव्यावर ऐकू शकता.
http://www.divshare.com/download/13036734-5b1
अत्त्यानंदजी धन्यवाद !
तुम्ही कवितेला चाल लावून ती गायलीत, मी नुकतीच ऐकली.
छान वाटलं ऐकताना .... अत्यानंद झाला म्हणा ना !
धन्यवाद !
dhanyawaad
agadi raddad,kupach prathamik,apan changalya kavinche vachat nahi,tadun baghat nahi.apalyach koshat asato.
@dsksatara hatakesocho
प्रांजळ प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
आधी वाचली होती, मस्तच आहे
धन्यवाद मंदार
छान आहे कविता.
धन्यवाद सुरेशजी
सुंदर कविता.
धन्यवाद गंगाधरजी
मुक्याचे गीत आवडले
टिप्पणी पोस्ट करा