दीपोत्सव
दीपोत्सवाचा हा सोहळा
परस्परांचा स्नेह जिव्हाळा
पणतीच्या मंद प्रकाशात
गवाक्षांचा साज आगळा
आकाश दिव्यांच्या रंगांच्या
माळा गगनी भरारल्या
सडा नभांगणात शिंपून
दशदिशा उजळविल्या
पर्णकुटीसह महालादारी
मंगल तोरण झुला घेई
अंगणीच्या तुळशी वृंदावनी
अल्पनाही रेखांकित होई
आकाशी झेपलेल्या चंद्रज्योती
अवनी भेटीस होती अधीर
रंगतुषारांच्या वर्षावात उजळे
सण हा दिवाळी शुभंकर
--
मिलिंद कल्याणकर
dershan@rediffmail.com
परस्परांचा स्नेह जिव्हाळा
पणतीच्या मंद प्रकाशात
गवाक्षांचा साज आगळा
आकाश दिव्यांच्या रंगांच्या
माळा गगनी भरारल्या
सडा नभांगणात शिंपून
दशदिशा उजळविल्या
पर्णकुटीसह महालादारी
मंगल तोरण झुला घेई
अंगणीच्या तुळशी वृंदावनी
अल्पनाही रेखांकित होई
आकाशी झेपलेल्या चंद्रज्योती
अवनी भेटीस होती अधीर
रंगतुषारांच्या वर्षावात उजळे
सण हा दिवाळी शुभंकर
--
मिलिंद कल्याणकर
dershan@rediffmail.com
2 comments:
छान आहे.
सुंदर कविता.
टिप्पणी पोस्ट करा