तुळशीबाग
खूप दिवस मनात आल होतं, एका प्लेन साडीला बॉर्डर किंवा लेस लावावी. कॉलेजच्या कामातुन जरा वेळ मिळाला आणि रविवारी बाहेर पडले. गाडी बिझीलॅंन्ड मध्ये लावली आणि वॉचमन पासून ओळखीचे एक दोन चेहरे यांना विचारलं, "काय आज वहिनींसोबत? काय मोठी खरेदी की काय!" "नाही हो, किरकोळ खरेदीच पण बायकोचं फ़र्मान म्हणल्यावर यावं लागलं!" मग शनिपाराच्या दिशेने आमचा मोर्चा!
एका जुनाट दुकानात मनाजोगती काही बॉर्डर, लेस काहीच मिळेना तेव्हा - "चला आता तुळशीबाग! पर्यायच नाही, गर्दी असली तरी जाऊया", अशा निश्चयाने आमची पावलं तुळशीबागेच्या दिशेने ! रस्ता ओलांडला तशी हळूहळू एकएक दुकान बाहेरुनच बघत तुळशीबागेत शिरले. रस्त्यावरच्या दुकानांची रूपं बदललेली ! गेली कित्येक वर्ष मी इकडे फिरकलेही नव्हते, हे ऐकले तर पुण्यातल्या तमाम बायका आर्श्च्याने म्हणतील, "काय, तुळशीबागेत जात नाही?"
पावलं अशोक एम्ब्रॉयडरीच्या दिशेने वळली. पहाते तर काय, तिथे बोर्डही दिसत नव्हता! "भलतंच दुकान दिसतंय", असं म्हणत पुढे शिरले. आता चालायचं नाही, तर गर्दीत शिरायचं अशीच अवस्था होती. नवऱ्याचा हात धरुनच गर्दीत शिरले.
वीस वर्षांपूर्वी, गणपतीच्या वेळेस गर्दीत शिरले तसंच शिरावं लागलं. बापरे ! हे काय सगळीकडे दुकानांचं रूप पालटलेलं. पर्सेस, ज्वेलरी, कॉस्मेटिक्स या शिवाय काही नाही. ते लोकरीचे गुंडे, सुया, टिकल्या, मणी यांनी भरलेल्या मोहक बरण्या कुठेच दिसेना! एका छोट्या दुकानात लांबून बॉर्डर, लेस पाहिल्या आणि आत गेले पण मनाजोगतं काही दिसेना. मग मोर्चा पुढे !
चला, सम्राटच्या दुकानात पण तिथेही ज्वेलरीच! आता काय, चला पुढे. गर्दीत कसेबसे दुसऱ्या टोकाला पोचले. तिथे एकच दुकान. 'आता शेवटचं, नाही तर परत जाऊ', अस म्हणून तिथे अनुरागमध्ये शिरले. तिथे मात्र मनाजोगती बॉर्डर मिळाली आणि अगदी खुष होऊन त्या नऊ मीटरच्या पट्टीसाठी ३८५ रुपये देऊन बाहेर पडले.
बाहेरच कॉर्नरला एक नेहमीचा भांडी विकणारा होता पण सोबत एक वेगळाच तरुण मुलगा. आधुनिक पध्दतीची छोटी छोटी भांडी बघून कोणत्याही बाईला मोह होणारच! सहज लक्ष गेलं! भातुकलीमधील छोटी छोटी स्टीलची भांडी. एक तीन कप्प्याचा टिफीन पाहून सहज हात लावला तर नवरा म्हणतो, "हे काय खेळण्यातली भांडी घेतेस? काही नको!"
"अहो, पण कालच पाहिलं, मनोजच्या बायकोनी याच डब्यात त्याला चटणी, लोणचं काहीतरी दिलं होतं!" माझं बोलणं पूर्ण व्हायच्या आत नवरा गर्दीत पुढे सरकला. नाईलाजानं तो डबा न घेताच पुन्हा गर्दीतून, लोंढ्यातून बाहेर पडले आणि किरकोळ खरेदी करुन घर गाठलं.
दुसऱ्या दिवशी पहाटे लवकरच जाग आली आणि मन पुन्हा तुळशीबागेत गेलं. कुठे गेली ती लोकरीची दुकानं?! ते बालपण, शाळेतली दरवर्षीची शिवणकामाची खरेदी! घरात पितळी भातुकली होती, तीच खेळायची. मला एक बंबसुद्धा हवा होता पण तो कधीच घेता आला नाही; पण मुलगा लहान होता तेंव्हा हौसेनं पुन्हा भातुकली आणली, त्याच्यासाठी.आणि आईनं त्याला बंब घेऊन दिला, मला देता आला नाही म्हणून!
खरंच काळाच्या ओघात किती बदललं! शिवणकाम, विणकाम करणारे हात आता कॉम्प्युटर, मोबाईलमध्ये अडकलेत! तुळशीबागेतला ग्राहक बदलला तशी दुकांनांची तऱ्हा बदलली. माझं मन मात्र त्या लोकरीत, भातुकलीत अडलेलं. आता बालपण पुन्हा येत नाही आणि बहिणीच्या नातीबरोबर खेळायचं तर तिच्याही हातात बार्बी डॉल आणि मोबाईल दिसतो... आपलं बालपण खूप मागे पडलं आणि आत्ताच्या बालकांचं बालपणच लवकर संपतंय!
या विचारांत सकाळ कधी झाली कळलंच नाही. कदाचित या भातुकलीच्या आठवणीने आणि मोहानेच मनोजच्या बायकोनेही तो डबा आणला असावा! काहीही असो, सध्या मन त्या तुळशीबागेतच आहे... त्या बालपणी पाहिलेल्या तुळशीबागेत! आणि कॉलेजला गेलं की तो छोटासा टिफीन रोज तिची आठवण करुन देईल.
--
प्रा. कांचन शेंडे
kshende.63@gmail.com

4 comments:
सुरेख...
ATTA TETHE JAN V PURVI JAN YAT PHARACH VICHARANCHEHI BADAL JHALE AHE, LEKH VACHATANA TULSHI BAUG DOLYA SAMOR UBHE RAHATE....
ME COLLEGE CHA STUDENT AHE,VACHATANA BHAVISHYAT KAY ASEL YACHA VICHAR DOLYA SAMOR YET AHE,.....
SHRIKANT GABALE - S.P.COLLEGE
tulshibag
at the time of reading I went 30 years back when I was in college studing in first year
Really this type of writing, I like very much
which takes you past in your student life.
I remember Vakankar Chahawalla, famous about Mara-Mari Tea (the mixture of special & sadha tea)
Very nice, keep writing
Best wishes
Charudatta Shende
I LIKED THE STORY VERY MUCH.IT IS VERY HEARTWHELMING.
I DO AGREE WITH YOUR ALL STATEMENTS REGARDING TULSIBAUGH.
YOU HAVE BRUSHED UP MY ALL THE MEMORIES REGARDING TULSIBAUGH.IT IS VERY TOUCHING ALSO.
KANCHAN MADAM OH......NOT MADAM BUT WORDSMITH KANCHAN KEEP IT UP AND GIVE THE FEAST OF DIWALI IN INNOVATIVE WAY.
YOUR LOVING FRIEND
DR.VILEENA S. INAMDAR
tulashibagech purvich rup dolyasamor ubhe karnare sahaj sope varnan! -sheetal pasalkar
टिप्पणी पोस्ट करा