छडा लागला रे!
तुझ्या सोबतीचा नशा लागला रे
असा जीवनाचा लळा लागला रे
मनी आठवांचे पुसूनी उसासे
कुसुंबी फुलांचा मळा लागला रे
अता भावनांची तृषा लोपली रे
सुखाचा झरा हा निळा लागला रे
फिक्या काजळाची झळाळी कितीशी
अभा रक्तिमेचा टिळा लागला रे
तुझ्या बासुरीचा झणत्कार होता
अता भैरवीला गळा लागला रे
पदस्पर्श होता तुझा राघवा रे
शिळेला स्वयंचा छडा लागला रे
--
सुरेश शिरोडकर
skarsuresh@gmail.com
असा जीवनाचा लळा लागला रे
मनी आठवांचे पुसूनी उसासे
कुसुंबी फुलांचा मळा लागला रे
अता भावनांची तृषा लोपली रे
सुखाचा झरा हा निळा लागला रे
फिक्या काजळाची झळाळी कितीशी
अभा रक्तिमेचा टिळा लागला रे
तुझ्या बासुरीचा झणत्कार होता
अता भैरवीला गळा लागला रे
पदस्पर्श होता तुझा राघवा रे
शिळेला स्वयंचा छडा लागला रे
--
सुरेश शिरोडकर
skarsuresh@gmail.com
3 comments:
dhanyawaad
या पहिल्या-वहिल्या मोगर्याच्या गजर्यात माझंही एक पुष्प गुंफल्याबद्दल धन्यवाद.
सुंदर कविता.
टिप्पणी पोस्ट करा