प्राक्तन
प्राक्तन फिदाच झाले यत्नास साधताना
मोती पुढ्यात आले वाळूस गाळताना
हलक्याच त्या हवेने का कोसळून जावा ?
हेका उगीच होता तो स्तंभ बांधताना
पिकल्या फळास नाही चिंता मुळी मुळाची
दिसलेच ना कधीही हितगूज सांगताना
शोधात भाकरीच्या निम्मी हयात गेली
स्वप्नेच वांझ झाली तारुण्य जाळतांना
द्रव्यापुढे द्रवीतो का कायदा म्हणावा?
नेमस्त गांजलेले कानून पाळताना
आता "अभय" जगावे अश्रू न पाझरावे
आशेवरी निघावे ही वाट चालताना
--
गंगाधर मुटे
gangadharmute@gmail.com
मोती पुढ्यात आले वाळूस गाळताना
हलक्याच त्या हवेने का कोसळून जावा ?
हेका उगीच होता तो स्तंभ बांधताना
पिकल्या फळास नाही चिंता मुळी मुळाची
दिसलेच ना कधीही हितगूज सांगताना
शोधात भाकरीच्या निम्मी हयात गेली
स्वप्नेच वांझ झाली तारुण्य जाळतांना
द्रव्यापुढे द्रवीतो का कायदा म्हणावा?
नेमस्त गांजलेले कानून पाळताना
आता "अभय" जगावे अश्रू न पाझरावे
आशेवरी निघावे ही वाट चालताना
--
गंगाधर मुटे
gangadharmute@gmail.com
6 comments:
वा! सुंदर आहे गझल!
mee mute jhaalo aahe
सुंदर!!
गझल छान आहे पण बहरबद्दल साशंक.
शोधात भाकरीच्या ... ह्या ओळी खूपच भावल्या. लिखते रहो!
धन्यवाद मित्रांनो,
सुरेशजी,आनंदकंद वृत्त आहे.
टिप्पणी पोस्ट करा