एअरपोर्ट - भाग १
तसा हा एअरपोर्ट हवाईदलाचा आहे. आम्ही, म्हणजे माझी अन्नदाती एअरलाईन, स्पेशल परमिशन घेऊन दिवसाला चार पॅसेंजर फ्लाईटसाठी त्यांचा रनवे आणि एका साईडचं टर्मिनल वापरतो. फी भरून. त्या छोट्या टर्मिनल बिल्डींगमध्ये पार्टिशन टाकून अरायव्हल आणि डिपार्चर वेगवेगळे केलेत. त्याच टर्मिनलमध्ये एक छोटी खोली घेऊन आमच्या कंपनीनं तीन लोकांना बसता येईल एवढं छोटं ऑफिस बनवलं आहे. उपकार आमच्यावर..नाहीतर मी ऑपरेशन्सवाला असूनही पूर्वी तिकीट काउन्टरच्या आतच बसायचो एक खुर्ची टाकून. मला "बेस ऑपरेशन्स ऑफिसर" अशा उद्देशानं या बेस वर पाठवण्यात आलं.
"तुला हा बेस एस्टॅब्लीश करायचाय स्क्रॅचपासून.. सुरुवातीला तू एकटाच असशील आणि लवकरच तुला आणखी ऑफिसर्स मदतीला येतील." अशा बोलीवर मी इथे आलो आणि ते "आणखी" ऑफिसर्स इतक्या वर्षांत कधीच आले नाहीत. त्यामुळे मीच इथे सगळी फ्लाईट ऑपरेशन्स पाहतो.
पॅसेंजर्स च्या हँडलिंगसाठी वेगळा स्टाफ आहे. पण त्यात कोणी कमी पडले तर मी अनाउन्समेंट, बोर्डिंग पास फाडून पॅसेंजर्स ना विमानात चढवणे वगैरे कामंही करतो. कारण त्यात दिरंगाई झाली तर फ्लाईट्चा मी शेड्यूल केलेला टाईम टळतो आणि मलाच क्लीअरन्सेस परत घेत बसावे लागतात.
मर्सिडीझ वगैरे मोठ्ठ्या गाड्यांची मिनीएचर मोडेल असतात तसा आमचा हा छोटासा एअरपोर्ट. एवढ्याशा जागेत सगळं अव्हेलेबल आहे. एस.टी.डी. बूथ, कॉफी मशीनयुक्त स्नॅक स्टॉल, इव्हन एक छोटंसं गिफ्ट शॉप सुद्धा.
बाकी एअरपोर्ट आहे म्हटल्यावर तिकीट काऊन्टर, बोर्डिंग काऊन्टर, पडदानशीन बाईसारखं बॅगेज एक्स रे मशीन, काळपट अजगरासारखा लांब कन्व्हेयर बेल्ट, पब्लिक अनाउन्समेंट बूथ हे आलंच.
तसा एअरपोर्टवर दिवसभर शुकशुकाट असतो. भल्या पहाटे येणारी एक फ्लाईट उगीच सगळ्या एअरपोर्टला उठवून ठेवते. झोप न येणारे पेन्शनर म्हातारे जसे उगीच सक्काळी सक्काळी तरुण पोरांची पांघरूणं खेचत बसतात तसं..
त्या फ्लाइट्च्या आधी तीन तास उठून मला वेदर रिपोर्ट घ्यावाच लागतो. पहाटेच्या अंधारात चाचपडत मी हपीस उघडतो. किल्ली माझ्याकडेच आहे. मेटार म्हणून जो विमानांसाठी खास बनवलेला वेदर रिपोर्ट असतो तो मी एअरफोर्सच्या टॉवरला फोन लावून खरडून घेतो. तिथला पेंगुळलेला कॉर्पोरल झोपेतच रिपोर्ट बरळतो आणि परत झोपतो. मला मात्र तसं करता येत नाही. कारण लगेचच मला फ्लाईट प्लॅन फाईल करून सर्व क्लीअरन्सेस घ्यायचे असतात. मी त्या वेदर रिपोर्टमध्ये व्हीजीबिलीटी दोन हजार फुटांपेक्षा जास्त आहे ना ते फक्त बघतो आणि मग शांत होतो आणि तो रिपोर्टही मी उगीच बघतो कारण रनवे व्हीजीबिलीटी मी बाहेर नुसत्या डोळ्यांनी बघून ठेवलेली असतेच. त्यासाठी मी अंधारातच रनवेवर चालत जातो आणि त्याच्या लांबच्या टोकाला असलेला एक ठराविक दिवा बघतो. तो दिसला की व्हीजीबिलीटी एकदम मस्त आणि पुरेशी असतेच.
पायलट्सनाही तेवढीच माहिती हवी असते. व्हीजीबिलीटी चांगली तर बाकी सर्व चांगलंच..पूर्वी फ्लाईंग शिकलेलं असल्यानं मला ते नीट माहिती आहे. आपण पायलट असूनही पुढे करिअर न करता आल्यानं ग्राउंडवर्क करतो याचा मला कुठेतरी गंडही आहेच.
ढग काय? क्युम्युलोनिम्बस डेंजरस.. तेही अगदी लँडिंग झोन मध्ये असतील तर. एरव्ही विमान सगळ्या हवामानाच्या खूप वरूनच उडत असतं.
बाकी ते वा-याचा वेग आणि दिशा वगैरे यंव यंव हजार गोष्टी तशाही क्षणाक्षणाला बदलतात आणि त्या खूप आधी माहीत होऊनही त्यात पायलट काहीच करू शकत नाही. रनवेच्या ज्या टोकाला उतरायचं त्या टोकाचा वा-याचा जमिनीलगतचा लँडिंगच्या क्षणी असू शकणारा वेग आणि दिशा आधीच सांगायची तर प्रत्येक ओब्झर्वेट्रीमध्ये मिस्टर ब्रह्मदेव यांनाच बसवून ते शक्य आहे. पण आपण आपली सुरक्षाकंडुशमनार्थ सगळी माहिती मागवायची बस्स.
आणखी एक माहिती म्हणजे मी याच एअरपोर्टवर राहतो. म्हणजे रात्री झोपायला जवळच एका ठिकाणी मी सोय ठेवली आहे. पण पहाटेच्या अंधारापासून रात्रीच्या अंधारापर्यंत मी इथेच असतो. हेच माझं घर आहे. कारण सकाळी आलेलं तेच ते विमान मी इथून दिवसभर वेगवेगळ्या सेक्टर्सवर पिदवतो आणि रात्री शेवटची फ्लाईट बनवून त्याला मूळ बेस वर परत पाठवतो. रात्री मुक्कामाला विमान ठेवायला एअरफोर्सची परवानगी नाही.
--
नचिकेत गद्रे
ngadre@hotmail.com

१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
---|
2 comments:
मोगरा फुललाच्य़ा संपादिका कांचन कराई व अन्य सवंगड्यासर्वांना सर्वांग सुंदर अंकासाठी दिपावलीच्या शुभेच्छा
नचिकेतजी,
आकर्षक लेखन व मला माहितीच्या वातावरणातील कथानकाची कथा आवडली.
टिप्पणी पोस्ट करा