एअरपोर्ट - भाग २
मग त्या दिवसभराच्या सर्व फ्लाइट्ससाठी टेकऑफ पूर्वी आमच्या नवसाच्या एकुलत्या विमानाचं काजळ, तीट, अंगडं-टोपडं करणं आणि ते फिरून परत आल्यावर त्याची शी शू काढणं यासाठी मला सर्व वेळ तिथंच असावं लागतं.
दुपारी मी दोन फ्लाईट्सच्या मधल्या वेळात कार्गो रूमच्या बाजूला आमची इंजिनीअरिंग रूम आहे त्यात झोपतो. तिथे कोणीच येऊ शकत नाही कारण परवानगीच नाही. तिथे जायला दरवाजा नाही. खूप लांब फिरून जावं लागतं. म्हणून मी कन्व्हेयर बेल्टवर बसून कार्गोत पोचतो आणि मग झोपायला जातो. ती माझी एक सिक्रेट गुहा आहे.
आमचा चीफ इंजीनीअर म्हणजे बंगाली म्हातारा सेनगुप्ता. पण तो स्वत:च फोनवर वगैरे "शेणगुत्ता हियर" असा स्वत:चा उल्लेख करत असल्यानं मग इथला मराठी वर्ग म्हणजे लोडर्स, सिक्युरिटी गार्डस वगैरे त्याला शेणगुत्ताच म्हणतात. किंवा नुसतंच गुत्ता.
गुत्ता एअरफोर्सचा रिटायर्ड सार्जंट आहे. पूर्वी एअरफोर्स मध्ये टेक्निशियन किंवा इंजीनिअर असावा. कंपनीने त्याला आमच्या विमानाची दुरुस्ती शिकायला झेक रिपब्लिकला पाठवलं होतं. तेव्हापासून जेव्हा तेव्हा " व्हेन आय वॉज इन चेकलीबाब्लिक...यु नो " करून बोबडं बोलत राहतो. मला तो "चेकलीबाब्लिक" ला म्हणजे नक्की कुठे होता हे कळायलाच खूप महिने लागले होते.
आमचे सर्व म्हणजे एकूण एक पायलट्स एक्स- एअरफोर्स ऑफिसर्स आहेत. दलबीर हा माझ्याच बेसवर असतो. तो पूर्वी एअरफोर्समध्ये ग्रुप कॅप्टन होता. त्याच्या शौर्य कथा सगळ्या फोर्समध्ये सांगितल्या जायच्या. मिग आणि सुखोईवर त्याची कमांड होती. खूप मोठा स्टाफ एकेकाळी हवाई दलात त्याच्या हाताखाली होता. फायटर विमानाच्या टेक ऑफ नंतर लगेचच बिघाड होऊन त्याचे आफ्टर बर्नर्स इंजिनसहित ब्लास्ट झाले तरी दलबीरनं काहीच न झाल्याप्रमाणे शांत मनाने लँड केलं. त्या नंतरच्या मेडिकलमध्ये त्याचं बी.पी. आणि पल्स सुद्धा एकदम नॉर्मल होतं. इतर कोणी हबक्यांनंच मेला असता. तो आता फोर्समधून रिटायर होऊन आमच्या एअरलाईनमध्ये छोटं पॅसेंजर विमान उडवतो. बाकीचेही सगळे तसेच. कोणी विंग कमांडर तर कोणी आणि काही. को-पायलट्स मात्र सगळी तरुण पोरं. सिव्हील सेक्टर मधली नवी नवी पायलट झालेली. बड्या बापाची पोरं. नाईटलाईफ, मौजमजा हे सर्व त्यांचं मेन लाईफ आहे. फ्लाईंग हा टाईमपास.
आमचं विमान खूप छोटं आहे. म्हणजे बीचक्राफ्टचं एक मॉडेल. वीस सीटर आणि टॉयलेट बसवलं तर दोन सीट आणखी कमी. माझ्या बेसवर येणारं विमान बिना टॉयलेटचं आहे. आणि आमचे सेक्टर्ससुद्धा छोट्या आणि मिडीयम आकाराच्या शहरांना जोडणारे आहेत. म्हणजे नागपूर, इंदोर, गोवा वगैरे. तसा आमच्या कंपनीचा जीव छोटा आहे. या विमानात दोन पायलट आणि एकच होस्टेस असते.
सकाळची तब्बल दीड तासाची केवढी तरी मोठ्ठी फ्लाईट करून थकून आलेल्या दोन पायलट्स आणि सुंदरीला हॉटेलवर सोडायला मी गाडी तयार ठेवलेली असते. ड्रायव्हरला चिठ्ठी देऊनही तो पिकअप आणि ड्रॉपचे घोळ करतोच.
माझ्याकडे, माझ्या बेसवर एकूण तीन एअर होस्टेस आहेत. बस्स तीनच. आणि त्यांच्यावर मला दोन फ्लाईट दिवसभरात चालवायच्या असतात. सकाळी बेस वरून विमानासोबत आलेली सुंदरी संध्याकाळी शेवटची फ्लाईट घेऊन परत जाते. मधल्या काळात ती हॉटेलमध्ये जाऊन मस्त झोपा काढते. फ्लाईंग क्रूच्या ड्युटीअवर्सना कायद्याची बंधनं आहेत. आम्हा जमिनीवर सरपटणा-यांना ती नाहीत.
मग मधल्या दोन फ्लाईट्ससाठी मला लोकल सुंदरींची नितांत जरुरी पडते. इथे माझे कोअर इश्यूज सुरु होतात. प्रत्येकीला आठवड्यातून दोन सुट्ट्या द्यायच्या. आठ तासाहून जास्त ड्यूटी सलग द्यायची नाही. वगैरे वगैरे मी मॅनेज करतोच. पण त्यांनी दांड्या मारल्या की माझी वाट लागते. रजेचं कारण विचारलं की माझ्या कानाला लागून हळूच "पीरीयड्स" असं कुजबुजतात. मला त्यावर काही म्हणजे काहीच बोलता येत नाही. हे आता इतकं कॉमन झालंय की मुलींना महिन्यातून कितीदा "पीरीयड्स" येतात याविषयी मला शंका यायला लागली आहे. मी शेवटी नाईलाजानं तिघींच्या सायकल्सचं गुप्त रेकोर्ड ठेवलं आहे. एकाच सुंदरीचा पिरीयड पंधरवड्यात दुस-यांदा आला की मी सरळ हरकत नोंदवतो आणि रजा नाकारतो.
हे विचित्र आहे पण कंपनी मला याहून एकही सुंदरी जास्त द्यायला तयार नाही आणि म्हणून ज्या आहेत त्यांना खूप रजा देणं मला शक्यच नाही.
दीप्ती सावर्डेकर, रिटा मेनन आणि निकिता सबरवाल या तिघी मुळात एअरहोस्टेस नाहीतच. आधी सकाळच्या फ्लाईटसोबत मेन बेस वरून दुपारची होस्टेस पॅसेंजर म्हणून यायची आणि पुढचे दोन सेक्टर करायची. पण त्यात एक सीट कायमची अडायची. बुकिंग वाढायला लागलं आणि सीट ठेवणं परवडेना. तेव्हा मला माझ्याच बेसवरच शहरातल्या लोकल मुलींतून तीन मुली ताबडतोब शोधून आणण्याची ऑर्डर आली. आकर्षक व्यक्तिमत्व आणि कमी पगारात काम करायची तयारी एवढंच हवं होतं. बाकी कोर्सबीर्स काही नको.
--
नचिकेत गद्रे
ngadre@hotmail.com

१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
---|
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा