एअरपोर्ट - भाग ६
दलबीरशी बोलताना मला हल्ली एक जाणवायला लागलंय की तो मराठी अस्खलित बोलायला लागलाय. गुत्ता पण इथे राहून राहून बहुतेक असेल, पण मराठीच बोलतो माझ्याशी.
आणि ते दोघे मिळून माझी खेचतात. वेड्यात काढतात. म्हणजे मध्ये एकदा फ्लाईट गेली म्हणून मधल्या वेळेत मी कनव्हेयर बेल्टवरून उकिडवा बसल्या बसल्या कार्गो कडे चाललो होतो, तर गुत्ता तिकडून आला आणि म्हणे “इथे कुठे पॅसेज मध्ये बसलायस रस्त्यात?”
मी म्हणालो, " सरजी..मस्करी बस हां. मैं सोने जा रहा हूं कार्गो में.. "
तेव्हा त्यानं हाक मारून एका लोडरला बोलावलं.
"चल, हो आत.. " असं म्हणत शब्दश: हातांना पकडून त्यानं आणि लोडरनं मला ऑफिसच्या रूम मध्ये नेऊन झोपवलं.
गुत्ता तर वयानं खूप मोठा आहे. पण लोडरनं माझ्या अंगाशी चेष्टा म्हणूनही अशी मस्ती करणं मला सहन होईना. मी त्याला एक लाफा ठेवून दिला. मग त्यानं मला रूममधल्या टेबलवर दाबून धरलं. गुत्तानंही माझे हात दाबून धरले. ही काय फालतूगिरी आहे! "सरजी..ये क्या मजाक है..?" मी जोर लावून हातपाय सोडवायला लागलो.
तेवढ्यात गुत्तानं माझ्या हातात काहीतरी टोचलं. "गुत्ता. कमीने..बुढ्ढे.. " मी किंचाळलो. वयाचा सगळा मान वगैरे गेला खड्ड्यात.. माझं भान सुटलं होतं..
"ही हॅज गॉन व्हायोलंट अगेन.. " गुत्ता कोणालातरी सांगत होता.
मला एकदम झोप आली. झोपेचं प्रमाण वाढलंय म्हटलं ना मी.. पण गुत्ता कोणाशी बोलतोय ते मला बघायचं होतं. बघतो तर माझे आई बाबा. आई रडत होती. मग मला अर्धवट झोप लागली. डोळे मिटलेले होते पण ऐकू सगळं येत होतं.
गुत्ता आईशी बोलत होता. " तो मला ‘सरजी’ अशी हाक मारतो. कधी कधी ‘गुत्ता’ अशी पण.. "
" काय करता येईल डॉक्टर? " बाबांचा आवाज आला.
..च्यायला गुत्ता डॉक्टर कधी झाला..?
"सांगता येत नाही. क्रॅशच्या शॉक मधून तो जो एकदम डीनायल मध्ये गेलाय त्यातून आधी बाहेर आला तरच. "
" एकच मुलगा आहे हो आमचा डॉक्टर ", आईला रडू आलं होतं, " तीन महिने झाले इथे त्याला.. नेमकं काय डायग्नोसिस आहे? " तिनं गुत्ताला विचारलं.
अरे गुत्त्या, हरामखोरा, आईला कशाला रडवतोस तुझ्या प्रँक्स मध्ये?
..आणि आई बाबांची गुत्ताशी ओळख कशी?
गुत्ता म्हणाला, " जागा असतो तेव्हा तो डायरी लिहित बसतो. म्हणजे, आम्हीच देतो डायरी अशा पेशंटना. तेवढीच पॉसिबिलिटी असते काहीतरी इनसाईट मिळण्याची. त्यात बघून आम्हाला कळतं की त्यानं अजूनही मनानं एअरपोर्ट सोडलेलाच नाहीये. त्याने ही सगळी पात्रं स्वत:भोवती बनवली आहेत. दलबीर, सेनगुप्ता वगैरे.. "
ही बघा त्याची डायरी, तो पुढं म्हणाला..
"तो त्या एअर होस्टेसमध्ये खूप इन्व्होल्व झाला होता. रनवेवर क्रॅश झाला.. त्यात सगळेच मारले गेले.. कॅप्टन दलबीर सुद्धा गेले.. आणि ती एअर होस्टेससुद्धा.. हे सगळं त्याला लक्षात आलेलं नाही, किंवा ते लक्षात घ्यायला त्याचा जबरदस्त रेझीस्टन्स आहे. आय मीन, हल्ली हल्ली तर तो खूप जास्त डीरेल झालाय. "
" डॉक्टर, आपण बाहेर जाउन बोलूया का? त्याला ऐकू येत असेल तर? ", बाबा म्हणाले.
"नाही तो झोपलाय आता गाढ. सीडेटिव्ह दिलंय ", गुत्ता म्हणाला.
खाकरून गुत्ता पुढे बोलायला लागला..
"तो हॉस्पिटललाच एअरपोर्ट समजून दिवसभर काहीतरी काम करत बसतो. हॉस्पिटलच्या बूथवरून फोन लावून मेटार वगैरे बोलतो. वेगवेगळ्या रूम मध्ये जाउन झोपतो. अंधारात ट्रॉलीच्या पायाच्या व्हीलला गोल गोल फिरवत बसतो विचारलं तर नोज व्हील चेक करतोय वगैरे अशी उत्तरं देतो. मध्ये मला पकडून धरलं. ग्रीस घाला ग्रीस यात. असं म्हणून व्हायोलंट झाला एकदम. "
"इतका कसा शॉक बसला असेल त्याला? डिनायलमध्ये कसा गेला ?" बाबा म्हणाले, "व्हाय इज ही नॉट एक्सेप्टिंग द फॅक्ट? दॅट होस्टेस इज डेड. डॉक्टर, त्यानं स्वत: तिथेच क्रॅशसाईटवर तिची बॉडी प्लेन मधून खाली काढली होती. तरीही?"
काय स्टोरी बनवतात बे गुत्ता आणि बाबा पण... हे गुत्ता आणि कंपनी नवे नवे खेळ काढतात आणि माझी झोप खलास करतात. म्हणे, हा सगळा एअरपोर्ट माझ्या मनाचा खेळ आहे. टूलरूम, कॉफीशॉप, टारमॅक, रनवे, एवढं दोन इंजिनवालं विमान, माझा कन्व्हेयर बेल्ट.. सगळं सगळं खोटं. रोज भेटायला येणारी दिपू.. ती पण माझ्या मनाचा खेळ.. आणि गुत्ताच्या या फालतू चेष्टा मात्र ख-या.. म्हातारा चळलाय.. रिटायर करा थेरड्याला ..
मग मात्र मला खूप खूप झोप आली.. जबरदस्त झोप...दुपारच्या फ्लाईटला वेळ आहे. मधल्या वेळात झोप.
हल्ली झोप वाढलीय हे मात्र नक्कीच..
--
नचिकेत गद्रे
ngadre@hotmail.com

समाप्त
--
नचिकेत गद्रे
ngadre@hotmail.com
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
---|
13 comments:
मस्तच !
शेवट अगदी अनपेक्षित !!
फार छान ! हा उपक्रम आवडला . हा दिपावली अंक अतीशय वाचनिय आहे . अगदि अप्रतीम ! अनिकेत.
मस्त झलिये कथा...एकदम अनंत सामंतांची कथा वाचत असल्याचा भास झाला. शेवट सही आणि अनपेक्षित.
फारच छान !!!
छान! अनपेक्षित शेवट!!
अप्रतीम कथा
शेवट तर एकदम वेगळा!
व्वा, याला म्हणतात रMगतदार गोष्ट! झकास !! नाचिकेतरावा, मस्टाचा लिहिलेई आहेसा.
वाचून आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दलसर्वाना अनेक धन्यवाद..
नचिकेत
शेवट वेगळा आहे. अजुन कथा रंगतदार करता आली असती.
उत्तम
वा! झकास कथा वाचल्याचं समाधान मिळालं.
सुधीर कांदळकर
mast katha
खूप छान!
टिप्पणी पोस्ट करा