जन्म कवितेचा

ये नच कविता कधि आमंत्रुन
येते कधि ना करुणा भाकुन
अनुभव, घटना मनास स्पर्शुन
जाती दुखवुन, कधी सुखावुन
विचार काहुर मनात दाटुन
जलदापरि ये मन ओथंबुन
शब्द, भावना संगम होउन
आशय बरसे काव्यघनातुन ......... १

ये नच कविता कधिही कळवुन
दार कुणाचे ना ठोठावुन
मनी जन्मुनी, येई आतुन
कवच मनाचे अवचित भेदुन
भाव मनीचे मनास लंघुन
निर्झरापरी झुळझुळ वाहुन
झर झर झरती ते झरणीतुन
आणि उतरती कविता होउन ...... २

ये नच कविता कधि हातातुन
सृजन तिचे हो मनगाभ्यातुन
विचार दर्या उधाण येउन
भाव उर्मी त्या उठती उसळुन
येति तटी अन् जाती विखरुन
शब्दांची ती रत्ने सांडुन
त्या शब्दांच्या पल्याड जाउन
भाव बोलती कविता होउन ........ ३

--
उल्हास भिडे
ulhasbhide@yahoo.co.in

7 comments:

Unique Poet ! १ नोव्हेंबर, २०१० रोजी १०:३२ AM  

अतिशय सुंदर ! अत्यंत सुयोग्य शब्दरचना !

मंदार जोशी २ नोव्हेंबर, २०१० रोजी ६:०८ PM  

जलदापरि ये मन ओथंबुन
- - वा! क्या बात है!! सही!!!

Suresh Shirodkar ११ नोव्हेंबर, २०१० रोजी १०:४४ PM  

अतिशय सुरेख शब्दरचना आणि सुंदर कविता.

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.