सखी?!
देवाने योजलेला आणि दैवाने मिळालेला सखा कोण?? प्रश्न खूप कठीण वाटतोय का?? उत्तर अगदी सोपं आहे. पण बऱ्याच लोकांच्या मनात ’राधा- कृष्ण’ म्हणजे कृष्णाची सखी राधा किंवा "त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधूःश्च सखा त्वमेव... " हे आठवून प्रश्नाचं उत्तर म्हणजे ’देव’ असावं का?? असंही वाटलं असेल पण तसे नाही...
ह्या प्रश्नाचं उत्तर पुरुषासाठी आहे ’पत्नी’ आणि स्त्री साठी आहे ’पती’. खरं म्हणजे हा प्रश्न एक यक्ष प्रश्न आहे.. यक्षाने धर्मराजाला विचारलेला आणि या प्रश्नाचे धर्मराजाने दिलेले उत्तर आहे ’सखी’!!
सखी! किती सुंदर शब्द आहे नाही का?? सुरुवातीच्या काळात म्हणजे लग्न होईपर्यंत या शब्दाचा एकच अर्थ माहिती असतो, तो म्हणजे ’मैत्रीण’- किंवा सखा म्हणजे मित्र! कुठल्यातरी एका सिनेमात अमिताभ बच्चनने पण हाच शब्द वापरला होता. कुठला सिनेमा ते आठवत नाही. तेव्हापासूनच हा शब्द मनामध्ये घर करून बसला होता.
वैदिक पद्धतीने लग्न करताना, लग्नाच्या वेळेस पण सप्तपदी चे सातवे पाऊल टाकताना ’सखा सप्तपदी भव’ असा मंत्र म्हंटला जातो. याचा अर्थ, "वर वधूला म्हणतो की आपण सात पावलं चाललो, आता हे सातवे पाऊल चालल्यावर - तू माझी ’सखी’ झालीस." हिंदू धर्मात इथे स्त्रीला समान हक्क दिलेले आहेत पण - ’तू माझी सखी हो’, असे म्हटले आहे, माझी दासी हो किंवा माझी सेवा कर असे म्हटलेले नाही. समान म्हणण्यापेक्षा इथे थोडे जास्तच अधिकार दिलेले आहेत. तू घरावर सत्ता गाजवणारी सम्राज्ञी हो अशा अर्थाचा मंत्र आहे वैदिक विवाह पद्धती मध्ये.
काल परवाच वाचण्यात आलाय एक श्लोक...
"अर्ध भार्या मनुष्यस्य भार्या श्रेष्टतमः सखा
भार्या मूल त्रिवर्गस्य भार्या मूल तरिष्यतः
यत्र नार्यस्तू पूज्यत्न्ते रमन्ते तत्र देवताः!"
ज्या घरात स्त्रीला मान आहे त्याच घरात देवांचे वास्तव्य असते. ज्या घरामध्ये स्त्रीचे अश्रू जमिनीवर पडतात तिथे लक्ष्मी वास करत नाही, अशा अर्थाचा एक श्लोक वाचनात आलाय. म्हणजे स्त्रियांना हिंदू संस्कृती मध्ये जितका मान दिला गेलाय तितका दुसरीकडे दिला गेलेला नाही. ’पती पत्नीचे’ नाते हे म्हणूनच (कॉम्प्लीमेंटींग इच अदर) एकमेकांना पूरक असेच असायला हवे. भारतीय संस्कृती मध्ये पूर्वी पासूनच स्त्रियांचे आणि पुरुषांचे काम वाटून दिलेले आहे. घराबाहेरची कामं पुरुष करेल तर घरातली कामं आणि मुलांचं संगोपन, ही स्त्री ची जबाबदारी. कदाचित ह्याचं कारण स्त्री पुरुषांची शारीरिक ठेवण वेगळी असणे हे पण असू शकते.
आजच्या काळात हे शब्दशः शक्य नसतं कारण स्त्री सुद्धा घराबाहेर पडलेली आहे आणि पुरुषाच्या बरोबरीने काम करून / नोकरी करून पैसा कमावते. हे जरी खरं असलं, तरीही पूर्वापार चालत आलेली घरची कामं जसे मुलांचे संगोपन आणि घरातली कामे पण एकट्या स्त्रीलाच करावी लागतात - घराचे घरपण टिकवून ठेवण्यासाठी! तसं म्हंटलं तर, स्त्रियांनी नोकरी सुरू केल्यापासून पुरुषदेखील हल्ली घरातल्या कामामध्ये थोडी मदत करतातच... पण.....
पण ती सगळी वरवरची कामं असतात. स्त्री घरामध्ये काय काय कामं करते हे लक्षात येतं ते फक्त जेंव्हा ती आजारी पडते तेंव्हाच. सकाळी उठल्यावर पांघरुणाच्या घड्या करणे असो, किंवा समोरच्या सोफ्यावर पडलेली नवर्याची ऑफिसची बॅग, डायनिंग टेबलवरची मुलांची अभ्यासाची पुस्तकं, समोरच्या शू रॅक वरचे व्यवस्थित लावून ठेवलेले शूज, जा्स्तीच्या दुधाचे लावलेले विरजण, उरलेलं सगळं फ्रीज मध्ये ठेवणे... अशी असंख्य कामं आहेत जी तुमच्या नकळत बिनबोभाट होत असतात. पण जेव्हा घरची स्त्री आजारी पडते तेव्हा घराची रयाच पार बदलून जाते आणि घरामध्ये किती कामं असू शकतात याची जाणीव होते. केवळ इतकेच नाही, तर एक वेगळं औदासीन्य पण साठून राहतं घरात. कुठल्याही परिस्थितीत तिने लवकर बरं व्हावं आणि घराकडे पुन्हा पहिल्यासारखे लक्ष द्यावे असे वाटू लागते. आणि ती जन्माची सहचारिणी ’सखी’ तिची आपल्या आयुष्यातली खरी जागा समजते.
स्त्रीला, लग्नानंतर जरी नवर्याने सप्तपदी मध्ये सातव्या पावलावर तू ’सखी’ हो म्हटलं असलं, तरीही ते काही लग्न झाल्याबरोबर ताबडतोब होत नसतं. लग्नापूर्वी पासूनची ओळख असली तरीही ’बायको’ची ’सखी’ व्हायला बरेच दिवस लागतात. सोबत राहिल्यानंतर एकमेकांच्या स्वभावातले गुण दोष जेंव्हा नीट माहिती होतात तेंव्हाच बायको नवर्याने न सांगता त्याच्या मनातलं ओळखू लागते आणि तेंव्हाच ती खर्या अर्थाने ’सखी’ होते. लग्नानंतर पहिली दोन वर्ष एकमेकांचे फक्त गुणच दिसत असतात. पुढली दोन वर्ष फक्त एकमेकांचे दोषच शोधण्यात जातात. हे सगळं एकदा स्वच्छ झालं की मग ’ती’ची सखी होण्य़ाची किंवा ’त्या’चा सखा होण्याची प्रक्रिया सुरू होते. सखी म्हणजे कोण?? तर भोजनेषू माता’, शयनेशू रंभा, वगैरे काहीतरी म्हणतात ना, तसे नाही. या शब्दाची व्याप्ती फार मोठी आहे तुमच्या आमच्या आयुष्यात आणि ती जेव्हा तुमच्या लक्षात येते, तेव्हाच जीवनाचा खरा अर्थ समजतो!
नुसता मित्र किंवा मैत्रीण हे दोन्ही शब्द एकेकटे असतांना कसे मस्त वाटतात, पण बायकोचा मित्र किंवा नवर्याची मैत्रीण हे नातं आलं की कसं वाटतं ना?? तरी बरं, चाळीशी पर्यंतच पझेसिव्ह कन्सेप्ट असतो. नंतर मग समजतं, ’ती’ त्याची’ मैत्रीण जरी कोणीही असली तरीही सखी मात्र ’ मी’च! पण चाळीशी पर्यंत?? छेः... कुठल्याही प्रकारे कोणीच भागीदार नको असतो, बायको मध्ये नवर्याला आणि नवर्यामध्ये बायकोला. पण एकदा चाळीशी ओलांडली, की तोपर्यंत परस्परांना व्यवस्थित समजून घेतलेले असतं म्हणून सगळे संशय वगैरे संपलेले असतात आणि जीवनाकडे बघण्याचा एक थोडा जास्तच प्रगल्भ दृष्टीकोन तयार होतो.
--
महेंद्र कुलकर्णी
kbmahendra@gmail.com

10 comments:
बेमिसाल या चित्रपटात राखीला अमिताभ ’सखी’ असे संबोधतो. त्यात ती विनोद मेहराची पत्नी असते. विनोद मेहरा अमिताभ पेक्षा लहान असल्याने अमिताभ राखीला भाभी म्हणायचे नाकारतो. त्याचा युक्तिवाद असतो - "लक्ष्मण की बीवी को राम भाभी कहे ऐसा कौनसी महाभारत में लिखा है?"
आपल्याला अपेक्षित असलेले स्त्री-पुरूष सहजीवन प्रत्यक्षात जगलेले दांपत्य म्हणजे सुनीताबाई व पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे. ’आहे मनोहर तर” या पुस्तकात त्यांच्या सहजीवनाचे यथार्थ वर्णन आहे.
सुंदर, लेख आवडला ,
आपल्या इतर लिखाणाप्रमाणेच हा लेखही वाचनीय आहे. आपला ब्लॉग मी आवर्जून वाचतेय गेल्या 1-2 महिन्यांपासून. फार छान लिहिता आपण. असेच लिहीत राहा. शुभेच्छा .
लेख आवडला. खरंच सखी या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे. कोणत्याही एका नाट्याची पट्टी लावून तिच मोजमाप करण अशक्य आहे.
चेतन, महेश, निशा, क्रांती,
सगळ्यांचे मनःपुर्वक आभार.. :)
khup chhan lekh.Ase sahajeevan asel ter prutvivar sagle sansar sukhache hotil.
Kanchan shende.
काका, अतिशय सुंदर जमलाय लेख.. आवडला खूप.
महेंद्र,लेख आवडला. सखी/सखा यामागचा खरा अर्थ तू छानच उलगडून दाखवलास. :)
लेख खूप खूप खूप छान आहे.
शब्दात सांगता येणार नाही इतका छान...................

टिप्पणी पोस्ट करा