आशा

आपण एखादे काम पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट घेतो. एखाद्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्यासाठी प्रसंगी आपण वेगाने धावत सुटतो. थोडक्यात विशिष्ट ध्येय प्राप्त करण्यासाठी आपले प्राण एकवटतो. सारं आयुष्य, वेळ त्यासाठी खर्च करतो आणि तरीही आपल्या इच्छित ध्येयापर्यंत पोहोचल्यावर आपल्याला ळतं की आपण पराभूत झालेलो आहोत, हरलो आहोत आणि मग… मग पुढे काय ? आपण आपल्यालाच विचारतो - पुढे काय ? आता काय ?

आपल्याला वाटतं की आपण आता काहीही करू शकत नाही. आपल्या हातात काहीही नाही. आपण सगळं गमावून बसलो आहोत. पण आपण खरंच सारं गमावून बसलेलो असतो का ? संपत का आयुष्य येथे? हाच का सगळ्याचा शेवट ? तर नाही. हा सगळ्याचा शेवट नक्कीच नाही. अजूनही एक गोष्ट आहे. ती आपल्यातच दडलेली असते. ती गोष्ट म्हणजे दुसरी तिसरी काहीही नाही तर आहे - आशा!

विल्यम वर्ड्सवर्थ म्हणतो की आपण प्रेम, स्तुती आणि आशा यावर जगतो. जीवन म्हणजे अशी प्रत्येक गोष्ट जिची सुरूवात आशेने होते. आशा हे असे स्वप्न आहे की जे माणूस जागेपणी पाहतो.

अशी कोणती गोष्ट आहे की जी आशेमुळे साध्य होत नाही ? आशा हीच आपल्या जीवनाचे बळ आहे. जर तुमच्याकडे आशा असेल तर तुमच्याममधे प्रचंड शक्ती, ताकद निर्माण होते. असा विचार आपण सतत करीत राहील पाहिजे की जगातली कोणतीही गोष्ट करणं मला शक्य आहे. आशाच आहे, जी तुमची इच्छा, तुमचं ध्येय पूर्ण करेल, तुम्हाला यश देईल, आनंद देईल. जे तुमच्यासाठी अशक्य आहे, ते आशा शक्य करेल.

आशेबरोबरच तुम्हाला हवी आहे श्रद्धा, खरेपणा आणि धैर्य. एखाद्या गोष्टीसाठी देवळात जाउन तुम्ही प्रार्थना करत असाल तर त्याच गोष्टीसाठी कठीण प्रयत्नही केले पाहिजेत. तुम्ही कोणत्याही गोष्टीचा विचार करत असाल, जसे शिक्षण, करियर, नोकरीत बढती आणि तुम्हाला त्यात अडचणी येत असतील तर तुम्ही फक्त एक गोष्ट करु शकता - ती म्हणजे चांगलंच होईल अशी आशा धरणं. एखाद्याला आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असं वाटत असेल, तर त्याचा स्वत:वर, स्वत:च्या क्षमतांवर, प्रयत्नांवर, तत्वांवर आणि कृतींवर पूर्ण विश्वास असायला हवा. तुमची पात्रता आणि तुमचा आत्मविश्वास या दोन यश प्रप्तीच्या किल्ल्या आहेत, हे लक्षात राहू द्या. अडचणींपेक्षा आशा निर्माण करणर स्वप्न हे भविष्याच्या दृष्टीने हितकारक स्वप्न होय.

आशा कुठे नाही? आशा सर्वत्र आहे. शेतकरी पावसाची आशा धरतो, पालक आपल्या मुलांच्या भवितव्याची आशा धरतात, तर एखादा भक्त देव दिसण्याची आशा धरुन जगत असतो आणि या सगळ्यासाठी शेवटी हवा असतो - धीर . कोणत्याही परिस्थितीत धीर सुटू देता कामा नये.

आता हेच पहा ना, बेकारी ही कित्येक देशांना छळणारी समस्या आहे. अगदी अमेरिकेसारखा प्रगत देशही बेकारीने त्रस्त आहे. प्रत्येकाला काम हवं असतं. कामाशिवाय मनही भरकटतात. याला उपाय काय? तर आशा! पॉलिन केजर म्हणतात की जेव्हा तुम्ही काही करत नसता तेव्हा तुम्ही भावनाप्रधान आणि शक्तिहीन होता. पण जेव्हा तुम्ही स्वत:ला कशाततरी गुंतवून घेता, तेव्हा तुमच्या मनात आशेची पालवी फुटते. ते काम पूर्ण करण हे तुमचं ध्येय बनतं आणि तुम्ही ते जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्नही करता . काहीतरी करण्याची शक्ती जागृत झाल्यामुळेच प्रत्येक गोष्ट साध्य होत असते.

इतिहास साक्ष आहे, कित्येक राजे युद्ध जिंकण्याच्या आशेमुळेच विजेते झाले आहेत. जिंकण्याची इच्छा म्हणजेच आशा. शेवटच्या क्षणीसुद्धा तुम्ही आशा बाळगू शकता. आशा ही मनाची एक अवस्था आहे. जेव्हा तुम्हाला समोर काळाकुट्ट अंधार दिसतो, तेव्हा तशा अंधारातही तुम्ही पुढे चालत जाता. का? पुढे गेल्यावर कुठेतरी, केव्हातरी उजेड दिसेल या आशेने. यशाची हीच तर पहिली पायरी आहे.

लक्षात ठेवा, आजची रात्र तुमच्या आयुष्यातली शेवटची रात्र नाही. तर उद्याची सकाळ तुमची वाट पहात आहे.

अलेकझान्डर त्याच्या आयुष्याच्याशेवटच्या काळात म्हणाला होता की त्याच्यासाठी त्याने फक्त बचत केली आहे ती आशांची. आशेशिवाय जीवनाची कल्पनाच करणं अशक्य आहे. आशेशिवाय व्यक्तींच्या जीवनाला काही अर्थच उरत नाही आणि तो त्याच्या आयुष्यातल्या कठीण काळात तरुन निघू शकत नाही.

आपण आपल्या डोळ्यांमध्ये खूप सारी आशा घेऊनच येतो या जगात. जीवनाच्या प्रवाहात पोहतो आणि सागराला मिळतो. बगीचामध्ये नवी स्वप्न पेरतो. काही जळतात, करपुन जातात पण काही जोमाने उगवतात, वाढतात. नव्याऋतूचा नवा रंग घेऊन नवी स्वप्न नव्या आशेने वाढत राहतात. निरोगी मनं घडत राहतात. यशस्वी आयुष्यं उभी होत राहतात.

--
तनुजा केळकर
tanuja.kelkar@gmail.com

9 comments:

अनामित,  २ नोव्हेंबर, २०१० रोजी ६:५६ PM  

खुपच छान आहे.

अनामित,  २ नोव्हेंबर, २०१० रोजी ७:०१ PM  

तनुजा ,छान लिहितेस.

अनामित,  ४ नोव्हेंबर, २०१० रोजी ९:१३ PM  

Great ! I didnt know this side of yours.

pranay ६ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:३१ PM  

खूपच छान लिहिले आहे तनुजा तुम्ही ह्या धकधाकीच्या जीवनात हे वाचून नवीन उमेद मिळते थॅंक्स

Meeta,  ८ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:३१ PM  

Great job, चांगले लिहिले आहे.

मिता

AK १८ नोव्हेंबर, २०१० रोजी ११:१७ AM  

I can very well read the script, but much of its meaning escapes me..it seems you are going places with expressing your view points,, and hats off to you for doing it in your mother tongue..

Tanu १८ नोव्हेंबर, २०१० रोजी ७:४९ PM  

I am really glad AK that being tamilian you read my article in marathi and
appreciate your efforts to understand it.

I have sent you an email to explain all your douts.

Thank you very much for your honest feedback.

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.