सिरिअल्स आणि मी...
सिरिअल्स वर हल्ली बरच बोललं जातय,
मी त्यातली एक, नेमाने पहायच्या हे ठरवलंय.
हल्ली मी टिकली सोडून कुंकू लावते,
छान दिसते का म्हणून, कुंकवाकडे हळूच पाहते
अवघाची संसारने मला पण घाबरवले,
आदर्श असले नको म्हणून एकटीच पाहते
असंभव होते म्हणून सुखात होते,
वहिनीच्या फोटोने सर्व शुभ्र भावले
अनुबंधच्या आगमनाने चांगलीच दचकले,
"देवा", "देवा" करत प्रश्नांनी भंडावले
अग्निहोत्र च्या घोटाळ्यात मी सहज अडकले,
नातेवाईक दूर आहेत म्हणून विचारात पडले
सप्तपदीच्या रडारडीने खूपच कंटाळले,
लक्षमणरेषा सीरिअल ने वैतागले
जोपर्यंत मी मलाच न बदलता राहते,
तोपर्यंत ह्या सिरिअल्स चे बस्तान चांगलेच बसते
घरात असूनही मी सार्यांपासून दुरावते,
जेंव्हा मी सारे बंद केले, घराला घरपण मिळाले
--
अनुजा पडसलगीकर
anuja269@gmail.com
मी त्यातली एक, नेमाने पहायच्या हे ठरवलंय.
हल्ली मी टिकली सोडून कुंकू लावते,
छान दिसते का म्हणून, कुंकवाकडे हळूच पाहते
अवघाची संसारने मला पण घाबरवले,
आदर्श असले नको म्हणून एकटीच पाहते
असंभव होते म्हणून सुखात होते,
वहिनीच्या फोटोने सर्व शुभ्र भावले
अनुबंधच्या आगमनाने चांगलीच दचकले,
"देवा", "देवा" करत प्रश्नांनी भंडावले
अग्निहोत्र च्या घोटाळ्यात मी सहज अडकले,
नातेवाईक दूर आहेत म्हणून विचारात पडले
सप्तपदीच्या रडारडीने खूपच कंटाळले,
लक्षमणरेषा सीरिअल ने वैतागले
जोपर्यंत मी मलाच न बदलता राहते,
तोपर्यंत ह्या सिरिअल्स चे बस्तान चांगलेच बसते
घरात असूनही मी सार्यांपासून दुरावते,
जेंव्हा मी सारे बंद केले, घराला घरपण मिळाले
--
अनुजा पडसलगीकर
anuja269@gmail.com
2 comments:
chr divas saasuche itakyaa varshaMnee taree sampat aale aahet ka?
कविता नाही आवडली, पण आशय आवडला.
टिप्पणी पोस्ट करा