थोडं माझ्या डोळ्यांत बघ
तुझ्या समोर प्रिये मला
इवलं इवलं दिसतंय जग
थोडं माझ्या डोळ्यात बघ
तुटकं तुटकं झालेलं
भरून येतं जेव्हा मन
बघता बघता डोळ्यादेखत
रितं होतं तारांगण
कसे होतात कोण जाणे
काळीज काळे पांढरे ढग
थोडं माझ्या डोळ्यात बघ
काय झालं कळत नाही
मन मागं वळत नाही
पापणकाठी टपोरलेले
थेंब देखील गळत नाहीत
विस्तव कुठं दिसत नाही
जाणवत असते केवळ धग
थोडं माझ्या डोळ्यात बघ
कुठून शिरतात घरामध्ये
होतात कसे तुझे भास
दारावरची वाजते बेल
कधी भोवती तुझा श्वास
आतून कशी कडी लावू
मनच आता बनलंय ठग
थोडं माझ्या डोळ्यात बघ
बोलत नसलो काही जरी
तुला तरी कळतंय ना...
फुल इथं टोचतंय मला
तुलाही ते छळतंय ना...
आज सांगू उद्या सांगू
असंच चाललंय मग मग
थोडं माझ्या डोळ्यात बघ
वाटतं आता उडून जावं
फुलांनाही खुडून जावं
तोडून आपण आपले तारू
खोल खोल बुडून जावं
काठी तुझी ओढ म्हणते
माझ्यासाठी अजून जग
थोडं माझ्या डोळ्यात बघ...
-
प्रफुल्ल भुजाडे
prafullabhujade@gmail.com
इवलं इवलं दिसतंय जग
थोडं माझ्या डोळ्यात बघ
तुटकं तुटकं झालेलं
भरून येतं जेव्हा मन
बघता बघता डोळ्यादेखत
रितं होतं तारांगण
कसे होतात कोण जाणे
काळीज काळे पांढरे ढग
थोडं माझ्या डोळ्यात बघ
काय झालं कळत नाही
मन मागं वळत नाही
पापणकाठी टपोरलेले
थेंब देखील गळत नाहीत
विस्तव कुठं दिसत नाही
जाणवत असते केवळ धग
थोडं माझ्या डोळ्यात बघ
कुठून शिरतात घरामध्ये
होतात कसे तुझे भास
दारावरची वाजते बेल
कधी भोवती तुझा श्वास
आतून कशी कडी लावू
मनच आता बनलंय ठग
थोडं माझ्या डोळ्यात बघ
बोलत नसलो काही जरी
तुला तरी कळतंय ना...
फुल इथं टोचतंय मला
तुलाही ते छळतंय ना...
आज सांगू उद्या सांगू
असंच चाललंय मग मग
थोडं माझ्या डोळ्यात बघ
वाटतं आता उडून जावं
फुलांनाही खुडून जावं
तोडून आपण आपले तारू
खोल खोल बुडून जावं
काठी तुझी ओढ म्हणते
माझ्यासाठी अजून जग
थोडं माझ्या डोळ्यात बघ...
-
प्रफुल्ल भुजाडे
prafullabhujade@gmail.com
2 comments:
खूप खूप आवडली ही कविता
छान कविता.
टिप्पणी पोस्ट करा