मन

“मन” हे कसं असतं
कुणालाच कळत नसतं
“मन” हे आपलचं असत
अस वाटतानाच चुकत असतं
क्षणात ते इथं,तर क्षणात ते कुठं
हे माहित नसतं................

मला वाटतं की मी मनावर राज्य करते...
“मन” माझ्या काबुत ठेवु शकते.
पण एवढे म्हणे पर्यंत........
“मन” कधीच फ़ूर्रऽऽ उडून गेलेलं असतं.

मी इथेच घरी बेडरेस्ट घेत असते...
पण हे पात्र मात्र.......
माझे असून सुद्धा
जगाची सैर करत असतं

क्षणात इथ तर क्षणात कुठं......
क्षणात नव-याच्या मागे फ़िरत असतं..
नवरा कुणाच्या मागे फ़िरतो ते बघत असतं
रिकामी वेडी मी, मनाला बघतच नाही
म्हणून संशयाचं भूत डोक्यात बसवत असते.
भूतच ते, डोक्यात घर करुन बसू लागतं.
आणि हळूहळू माझं अन्‍ नव-याचं बिनसू लागतं
बघणारी टाळकी आम्हां हसू लागतात..
असं हे मन तळ्यातच नसतं पण मळ्यात मात्र उगवतं....

मी मी म्हणणा-यांना अजून “मन” कळलेले नाही
संशोधकांनाही हे आव्हान पेलवलेले नाही...
जगात सगळी सुखं हात जोडून उभी आहेत.
अन् मला त्यात डुबकी मारायची संधी ही आहे.
पण “मन” मात्र माझे पाय ओढत असते.
कधी भूतकाळात गटांगळ्या खात असते
तर कधी भविष्याची सैर करत फ़िरत असते.
आणि मला मात्र.....मला मात्र
साधं वर्तमानात ही सुखानं जगू देत नसते...

शेवटी एकदा ठरवलं,
एवढं शिकलो सवरलो आपण
आता “मन” कन्ट्रोल करायचं
अहो पण नेमकं काय करायचं?
खूप विचारांती पक्कं केलं
एक धाडस करायच ठरवून टाकलं
ऐवी तेवी एवढं शिकलोय आपण
पण पी.एच.डी. तेवढी बाकी राहिलीय..

आता पी.एच.डी.च नक्की केलं...
विषय घेतला — “मन”
“मना”साठी काय वाट्टेल ते करायचं..
पण राबायचं नक्की.
सुरु झालं संशोधन, मनावरची पुस्तके बघणे
लायब्ररी मागून लायब्ररी धुंडाळल्या,
अगदी हॉर्वड युनिव्हर्सिटीत ही जावुन आले.
पण—पण हाती काहीच लागले नाही.

विचार करता करता सुन्न बसून राहिले.
पी.एच.डी. ची स्वप्ने नुसतीच बघत राहिले
मधे बराच काळ लोटला.....
सारे विसरुन ही गेले..
अचानक एक दिवस सकाळी सकाळी
अंथरुणातच स्वस्थ डोळे मिटुन बसुन राहिले
विचार करता करता, विचार मागे सरत गेले
सरत नव्हते ते सारवले.......

असाच किती वेळ गेला ते कळले नाही
क्षणात काय झाले ते समजले नाही
हवेत तरंगतोय असा भास झाला
तरंगता तरंगता ओंकार नाद जाणवू लागला
अवकाशात एकटीच विहार करु लागले.
माझी मीच स्वत:ला हरवुन गेले...

थोड्या वेळाने जाग आली.
क्षणभरात सर्व उमजुन आले..
आणि जोरात “युरेका”, “युरेका” म्हणुन गेले
अरे! हेच तर ते गमक!
याचेच तर नाव मन:शांती! ध्यान धारणा!

हेच तर या “मना” वरचे खरे रिमोट कंट्रोल.
आता हवे तेंव्हा हवे तिकडे वळवायचे
त्याने नाही आता ,आम्ही राज्य करायचे...
योग –ध्यान धारणा करुन जग जिंकायचे..
जग जिंकायचे!!!!

--
पल्लवी कुलकर्णी
pallavikularni@gmail.com

3 comments:

Deepak Parulekar १ नोव्हेंबर, २०१० रोजी १:०४ PM  

सुंदर, खुप छान!!

बहीणाबाईंची " मन वढाय, वढाय!" आठवली !

Marathi Paul ४ नोव्हेंबर, २०१० रोजी ४:०७ PM  

महोदया,
मनावर सखोल भाष्य करणारा जगातील पहीला मानसशास्त्र्ज्ञ म्हणजे "श्री समर्थ रामदास स्वामी", त्यांचे मनाचे श्लोक हाच पी.एच.डी. चा विषय होवु शकतो, असो कविता एकदम सुंदर झाली आहे.
अमोल देशमुख

Unknown १३ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:२९ PM  

खूपच सुंदर कविता..... मला खूप आवडली....

पियुषा कुलकर्णी- नाडगौडा

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.