पेढ्यांची साटोरी
साहित्य:
पाव किलो पेढे, खसखस, वेलदोड्याची पूड, आणि भिजवलेली कणीक
कृती:
प्रथम पेढे हाताने मोकळे करुन घ्यावेत किंवा ओव्हन मध्ये २० सेकंद ठेवावेत.नंतर खसखस भाजुन त्याची पूड आणि वेलदोड्याची पूड घालून हाताने मळून त्याचा गोळा तयार करुन घ्यावा.
एका परातीत तिंबलेली कणीक घ्यावी. नंतर कणकेचा लिंबा एवढा गोळा घेऊन हातावर वाटी सारखी पारी करुन त्यात कणकेच्या गोळ्या पेक्षा किंचित मोठा पेढ्याचा गोळा घेवुन पुरण भरतात त्या प्रमाणे भरुन गोळा तयार करावा.
पोलपाटावर पिठी पसरुन ह्लक्या हाताने तो गोळा लाटावा.पुरी पेक्षा किंचीत मोठ्या आकारा पर्यंत लाटावा व तव्यावर शॅलोफ़्राय करावा, म्हणजे दोन्ही बाजुने १ चमचा तेल पसरुन मस्त खरपूस भाजुन घ्यावा.
मस्त खरपूस पेढ्याची साटोरी खाण्यासाठी तयार!
ही पोळी तुपाबरोबर मुलांना खाण्यास द्यावी.
टीप:
कणके ऐवजी मैदा घेतला तरी चालतो.
--
पल्लवी कुलकर्णी
pallavikularni@gmail.com
इतर पाककृती:
1 comments:
मस्तच एकदम, आमच्या घरी आई माव्याची पोळी करते...कृती अशीच असते..मावा खमंग भाजून, साखर टाकून थंड करायचा आणि ते सारण पोळीत भरायाच आणि गरमा गरम खायच्या :)
टिप्पणी पोस्ट करा