सचित्र स्वाक्षरी संग्रह

नमस्कार मित्रमैत्रीणींनो,

कुणाला आवडतं संगीत, कुणाला चित्रपटा कुणाला खेळात रस असतो, तर कुणाला व्हायचं असतं आंतरराष्ट्रीय किर्तीचा शास्त्रज्ञ! या सर्वच क्षेत्रांमधे आपल्या मेहनतीने आणि चिकाटीने नावलौकिक कमावलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल मला आदर आहे. मग ती व्यक्ती भारतातील असो, वा इतर कुठल्याही देशाची. आपल्या देशाचं नाव सातासमुद्रापलिकडे घेऊन जाणार्‍या अशा व्यक्तींना भेटून त्यांची स्वाक्षरी मिळवण्याचा मला छंद आहे. छंद कसला, वेडच आहे म्हणा ना! एअर इंडियासारख्या प्रतिष्ठीत कंपनीमधे ३० वर्षे इमाने इतबारे सेवा केल्यानंतर, आरक्षण विभागाचा व्यवस्थापक (रिझर्वेशन मॅनेजर) म्हणून मार्च २००१ मधे सेवानिवृत्त झालो पण स्वाक्षर्‍या जमवण्याचं हे वेड आजही टिकून आहे.

१९५५ सालच्या एका क्रिकेटसामन्याच्या वेळेस, नरेंद्र ताम्हाणे, एम. एस. पाटील, वाय. बी. पटवा इ. मान्यवरांच्या स्वाक्षर्‍यांनी जणू माझ्या स्वाक्षरी संग्रहाची मुहूर्तमेढच रोवली गेली. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र सभा, वसंत व्याख्यानमाला, नाट्य-चित्रपट पारितोषिक वितरण समारंभ अगदी नामवंतांच्या घरी, हॉटेल्समधे, खुद्द विमानात आणि कामावर असताना काउंटरवर, अगदी कुठेही स्वाक्षर्‍या मिळवत गेलो. काही स्वाक्षर्‍या पत्ररूपाने, मित्रांकडून, प्रदर्शनांना आलेल्या प्रेक्षकांकडून भेट मिळाल्या.

थोडं थोडं करता करता एक सुंदरसा संग्रह तयार झाला. या संग्रहात कला, नाट्य-चित्रपट, संगीत, क्रीडा, वाङमय, राजकारण याप्रमाणेच राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, मंत्री, राज्यपाल, राजदूत, उद्योगपती, सेनाध्यक्ष, भारतरत्न, पद्म पुरस्कार विजेते, नोबेल पारितोषिक विजेते, चंद्रवीर, गिर्यारोहक, व्यंगचित्रकार संशोधक, समाजसेवक, हॉलिवूड कलाकार अशा अनेकविध क्षेत्रातील देशविदेशीच्या २१०० हून अधिक मान्यवरांच्या स्वाक्षर्‍या मी जमवल्या. ५०० हून अधिक मान्यवरांसोबत त्यांच्या स्वाक्षर्‍या घेतानाची माझी छायाचित्रे जमवलेली आहेत. त्यात मान्यवरांची छायाचित्रे, त्यांनी पाठवलेली व्यंगचित्रे, टपाल तिकीटांची प्रथम दिवस आवरणे, विमान्य कंपन्यांची प्रथम उड्डाण आवरणे, क्रिकेट बॅट्स, बॉल्स, इतर क्रीडा साहित्य, पुस्तके, वर्तमानपत्रातील कात्रणे आदी वस्तूंवर स्वाक्षर्‍या घेतलेल्या आहेत. आता सांगा, हा छंद हे एक वेडच आहे की नाही?

या संग्रहाने मला काही बहुमानही मिळवून दिले:

. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या १९९० च्या पहिल्या आवृत्तीत नोंद होणारा पहिला भारतीय स्वाक्षरी संग्रहक होण्याचा मान मला मिळाला.
२. फुटबॉलचा अनभिषिक्त सम्राट पेले यांना १९८६ पर्यंत भेटणारा मी एकमेव भारतीय आहे.
३. स्वाक्षरी संग्रहाची एकट्याची ७ प्रदर्शने (वन मॅन शोज्) भरवणारा मी पहिला भारतीय ठरलो.
४. स्वाक्षरी संग्रहावर आधारित ’स्लाईड्स अ‍ॅन्ड टॉक शो’चे देश-विदेशात ३५ हून अधिक प्रयोग करणारा पहिला भारतीय होण्याचा मान मला मिळाला.

याशिवाय आणखी काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी घडल्या:

१. दूरदर्शन, आकाशवाणी, मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिके इ. माध्यमांतून वेळोवेळी स्वाक्षरी संग्रहावरील माहीती प्रसिद्ध करण्यात आली.
२. मुलखावेगळी माणसं, मायमराठी, सुरभी, क्रिकेट क्लब, आजचे पाहूणे, संवाद अशा अनेक दूरदर्शन कार्यक्रमांधून माझी मुलाखत घेण्यात आली.

पण हे सर्व होत असताना तुम्हाला असं वाटत असेल, की मी ज्यांना भेटलो त्या प्रत्येक मान्यवराने मला स्वाक्षरी दिलीच किंवा मी मिळवलीच, असं काही झालं नाही. प.पू. गोळवलकर गुरूजी, डॉ. सी.डी. देशमुख, बालगंधर्व, डॉ. अमर्त्य सेन, रिची बेनॉ यांनी मला स्वाक्षर्‍या देणं नाकारलं होतं. तर डॉ. होमी भाभा, सर फ्रॅंक वॉरेल, प्रिन्स चार्लस् यांच्या स्वाक्षर्‍या थोडक्यात हुकल्या. आणखी एक कटू आठवण म्हणजे ६०-७० स्वाक्षर्‍या असलेली वही हरवली!

काही गोड व मजेशीर आठवणीही मला या स्वाक्षरी संग्रहाच्या निमित्ताने मिळाल्या:

१. या संग्रहाच्या या वेडामुळेच मला एअर इंडियातील नोकरी मिळाली.
२. पहिल्यावहिल्या लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समधे संग्रहाची नोंद झाली आणि त्याची प्रत भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या हस्ते मिळाली.
३. जवळजवळ गहाळच झालेल्या स्वा. सावरकरांची स्वाक्षरी अचानकपणे मला रस्त्याच्या कडेला पाण्याच्या ओघळात सापडली.
४. दु्बईमधे डॉ. नेल्सन मंडेला व श्रीलंकेत डॉ. जयवर्धने यांच्या स्वाक्षर्‍या जमवताना तर जवळजवळ नक्की झालेला तुरूंगवास टळला.
५. प्रत्यक्ष वैयक्तीक भेटीत नकार दिल्यानंतरही भारतरत्न डॉ. पां.वा.काणे यांची स्वाक्षरी पत्रोत्तरातून मिळाली.
६. अभिनेता अनिल कपूर ऐवजी अभिनेत्री माधुरी दीक्षित व अभिनेता हृतिक रोशन ऐवजी अभिनेता जॉन अब्राहम यांच्या स्वाक्षर्‍या अनपेक्षितपणे मिळाल्या.
७. साडेतीन तासांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर नेपाळच्या राजा महेंद्र व राणी रत्ना यांच्या स्वाक्षर्‍या मिळाल्या, तर एका दिवशी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर ४० हून अधिक आंतरराष्ट्रीय किर्तीच्या खेळाडूंच्या स्वाक्षर्‍या मिळाल्या.
८. डॉ. होमी सेथना यांना आवडले नसतानाही पाहुण्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांनी मला मोठ्या आनंदाने स्वाक्षर्‍या दिल्या.

अशा कित्येक आठवणी मी मनाच्या कुपीत जपून ठेवल्या आहेत. जसंजसं वेड वाढत गेलं तसतशी स्वाक्षरी संग्रहात भरच पडत गेली. संग्रहातील काही मौलिक स्वाक्षर्‍यांचा उल्लेख इथे करतो आणि रजा घेतो.

नेताजी सुभाषचंद्र बोस, चंद्रवीर, डॉ. राजेंद्रप्रसाद, वीर सावरकर, जे. आर. डी. टाटा, मदर तेरेसा, हिलरी, पेले, तेनसिंग, व्ही. शांताराम, पृथ्वीराज कपूर, उस्ताद बिस्मिल्ला खान, उस्ताद बडे गुलाम अली खान, डॉ. धो. वि. कर्वे, न.चि. केळकर, वि.स. खांडेकर, पु.ल. देशपांडे, वि.वा. शिरवाडकर, सर गारफिल्ड सोबर्स, सर डॉन ब्रॅडमन, सुनील गावसकर, सचिन तेंडूलकर, रॉड लॉवेर, बियॉर्न बोर्ग, विश्वनाथन आनंद, बिल गेट्स, बिल क्लिंटन, आर. के. लक्ष्मण, रतन टाटा, मुकेश अंबानी आणि किती तरी!

धन्यवाद.



--
विजय देशपांडे
vijay2603@gmail.com

7 comments:

सौरभ १ नोव्हेंबर, २०१० रोजी ५:२१ AM  

great great great!!! amazing!!! hats off to your efforts!!!

Suhas Diwakar Zele १ नोव्हेंबर, २०१० रोजी ९:४३ AM  

वाह अफलातून छंद आहे तुमचा...
तुमची चिकाटी मानली. खूप खूप शुभेच्छा

Unknown २० जानेवारी, २०१४ रोजी ११:४५ PM  

कवितासागर साहित्य अकादमी KavitaSagar Sahitya Akademi
डॉ. सुनिल पाटील, कार्यकारी संचालक - कवितासागर साहित्य अकादमी, जयसिंगपूर, सुदर्शन पॅलेस, प्लॉट # 16, पद्मावती सोसायटी, बायपास रोड, नांदणी नाक्याजवळ, मायस्कूलच्या पाठिमागे, जयसिंगपूर - 416101, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र दूरध्वनी: 02322 - 225500, 09975873569, sunildadapatil@gmail.com, sabdainindia@gmail.com

वार्षिक सभासदत्वासाठी अर्ज: एप्रिल 01, 2014 - मार्च 31, 2015 An application for the annual membership: April 01, 2014 - March 31, 2015

आपणांस लागू पडणा-या खालील प्रकारावर (√) अशी खुण करावी. (आवश्यकता भासल्यास एका पेक्षा अधिक प्रकारावर खुण करता येईल.)
[ ] लेखक [ ] कवी [ ] अनुवादक [ ] पत्रकार [ ] संपादक [ ] प्रकाशक [ ] नाटककार [ ] विनोदी लेखक [ ] कादंबरीकार [ ] कथाकार [ ] निबंधकार [ ] इतिहास संशोधक [ ] समीक्षक [ ]__________

नाव Name
शिक्षण Education
पत्ता Address

दूरध्वनी Telephone
मोबाईल Mobile
ई - मेल E-mail
वय / जन्मतारीख Age / Date of Birth
व्यवसाय Profession
छंद Hobbies
o माझ्या सर्व प्रकाशित साहित्याची एक - एक प्रत विनामूल्य अकादमीकडे सादर करेन. कवितासागर साहित्य अकादमीची वार्षिक वर्गणी रुपये _____ सोबत Money Order / Demand Draft द्वारा “कवितासागर” या नावाने पाठवीत आहे, तसेच माझे दोन छायाचित्र अर्जासोबत देत आहे. कृपया मला अकादमीचे वार्षिक सभासदत्व देण्यात यावे हि विनंती.
o वार्षिक सभासद शुल्क: [ ] विद्यार्थी - 325/- [ ] व्यक्ती - 375/- [ ] संस्था - 1200/-

स्वाक्षरी Signature ______________ दिनांक Date ___________ ठिकाण Place _____________

आम्ही आपल्यासाठी हे करू...

• कवितासागर नियतकालिकामधून व कवितासागर दिवाळी अंकामधून आपले साहित्य प्रसिद्ध करण्यास प्राधान्य.
• कवितासागर प्रकाशनामार्फत प्रसिद्ध सर्व मासिके / पुस्तकावर 10% विशेष सवलत देण्यात येईल.
• आपला प्रवेश अर्ज व वार्षिक सभासद शुल्क प्राप्त झाल्यानंतर लगेचच सभासद प्रमाणपत्र पाठविण्यात येईल.
• कवितासागर द्वारा आयोजित व प्रायोजित कवी संमेलनामधून आपले साहित्य सादर करण्यासाठी प्राधान्य.
• विविध साहित्यिक व सामाजिक संस्था यांच्या द्वारा आयोजित साहित्यिक उपक्रमांची माहिती, साहित्यिक स्पर्धा, संमेलने, मेळावे, कार्यशाळा साहित्यिक शिष्यवृत्ती, साहित्यिक मानधन आणि साहित्यिक पुरस्कार यांची माहिती अकादमीच्या सर्व सभासदांना वेळो - वेळी देण्यात येईल.
• कवितासागर प्रकाशना अंतर्गत विविध योजना व उपक्रमामध्ये अकादमीच्या सभासदांना प्राधान्य देण्यात येईल.
• अकादमीशी सलग्न विविध मासिके / दिवाळी अंकामधून अकादमीच्या सभासदांना साहित्य प्रसिद्धीसाठी प्राधान्य.
• अकादमीच्या सभासदांच्या पुस्तक प्रकाशन, परीक्षण आणि प्रदर्शनासाठी मार्गदर्शन.
• कवितासागर प्रकाशनामार्फत पुस्तक प्रकाशित करण्यासाठी अकादमीच्या सभासदांना प्राधान्य.
• अकादमीच्या सभासदांची प्रसिद्ध झालेली पुस्तके ई-बुक स्वरुपात तयार करण्यासाठी मार्गदर्शन व प्राधान्य.
• सभासदांच्या नवीन पुस्तकांची ISBN नोंदणी करण्यासाठी मार्गदर्शन व प्राधान्य.
• सभासदांच्या नवीन पुस्तकांची कॉपी राईट नोंदणी करण्यासाठी मार्गदर्शन व प्राधान्य.
• सभासदांच्या पुस्तकांची परीक्षणे / पुस्तक परिचय विविध नियतकालिकामधून प्रसिद्ध करण्यासाठी मार्गदर्शन.
• अकादमीचे मुखपत्र "कवितासागर" च्या वार्षिक वर्गणीवर अकादमीच्या सभासदांना 10% विशेष सवलत.
• अकादमीच्या सभासदांना आपल्या परिसरात साहित्यिक मेळावा, कार्यशाळा, कवी / साहित्य संमेलनासाठी मार्गदर्शन केले जाईल.
• अकादमीच्या सभासदांना अल्प देणगीमूल्यात ग्रंथालयाची सोय; बाहेरगावच्या सभासदांना टपालाद्वारे पुस्तके पाठविली जातात.
• अकादमीच्या सभासदांचा साहित्यिक परिचय "कवितासागर" नियतकालिकामधून प्रसिद्ध करण्यासाठी प्राधान्य.
• सभासदांना अकादमी द्वारा निर्मित व वितरीत सर्व ई-बुक्स संपूर्णपणे मोफत दिली जातील.
• अकादमीच्या ई-लायब्ररी मध्ये असलेल्या ई-पुस्तकांचा व ई-नियतकालिकांचा सभासदांना संपूर्णपणे मोफत लाभ घेता येईल.
• ६० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या किंवा मागील वर्षापासून सातत्यपूर्ण समाज प्रबोधनपर, समाजोपयोगी व सकस लिखाण करणा-या साहित्यिकांना अकादमीच्या वतीने दिल्या जाणा-या दरमहा मानधन योजनेसाठी अकादमीच्या सभासदांकडून आलेल्या प्रस्ताव अर्जांना प्राधान्य.
• अकादमी द्वारा दिल्या जाणा-या विविध साहित्य व सामाजिक पुरस्कारांसाठी अकादमीच्या सभासदांना प्राधान्य.
• अकादमी द्वारा आयोजित पुस्तक वितरण व पुस्तक प्रदर्शनामध्ये अकादमीच्या सभासदांना प्राधान्य.
• अकादमी द्वारा निर्मित विविध साहित्यिक सूची व ग्रंथ सूची मध्ये अकादमीच्या सभासदांना प्राधान्य.

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.