सौदागर - भाग ६
उतरणार कसं?
गाडीचा स्पीड अगदी लो केला, गाडी स्टेशनपर्यंत आणली. गाडीचा दरवाजा उघडला आणि बाहेर उडी टाकली. त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टॅक्सीची चावी काढली. म्हणजे स्फोट व्हायला नको.
खरं तर मी लवकर पोहोचलो असतो पण या प्रकारामुळे बराच वेळ गेला आणि गाडी सुटायच्या अर्धा तास आधी मी धावत पळतच डब्यात चढलो.
हा अनुभव शब्दबद्ध केल्याशिवाय मला रहावेना म्हणून मी ही डायरी लिहीत आहे. मनावर या सगळ्या गोष्टींचा एक विचित्र ताण आला होता, एक प्रकारचं ओझं आलं होतं, ते जरा हलकं करण्याचा हा प्रयत्न! आणि खरोखरंच... मनावरचं ओझं गेलं होतं, मनावर एक छान प्रसन्नता आली होती.
“अरे वा! वा! वा!” मी आनंदाने ओरडलो. आता मला लोकांची पर्वा नव्हती. शेवटी बारा वाजले. मी मनगटी घड्याळात पाहिलं आणि माझा आनंद गगनात मावेना. मी डायरी मिटली, कडकडून आळस दिला, तोंड पुसलं आणि निर्धास्त झालो.
आता कसली भीती? ना मला कुणी पाहिलं, ना पाठलाग केला. बॉसने सांगितलेला वेळ संपला आणि काहीही म्हणा, माझा बॉस शब्दाला पक्का. तो आता काहीही करणार नाही. आता तिच्या बरोबर सुखात संसार. ’सब्रका फल मीठा होता है’ म्हणतात ते काही खोटं नाही. पुढे ही डायरी वाचताना आम्ही दोघेही माझ्या भित्रेपणावर खदखदून हसू.
******
“अरे वा! वा! वा!” तो आनंदाने ओरडला. त्याला आता लोकांची पर्वा नव्हती. तो जिंकला होता जणू निर्विवादपणे. त्याने मनगटी घड्याळात पाहिलं, बारा वाजल्याची खात्री केली आणि सुटकेचा नि:श्वास सोडला. डायरी मिटून ठेवली.
“आता काही भीती नाही. उद्या गाडी दुसर्या. शहरतात पोहोचेल. खरं तर कुठलं शहर, हे त्याने तिकिटावरसुद्धा पाहिलं नव्हतं. असो. जे कुठलं असेल, ते.
त्याने कपाळावरील घाम पुसला, खसखसा तोंड पुसलं आणि निर्धास्तपणे डोकं टेकलं. ’भविष्यात प्रेयसीबरोबर काय करायचं’ या स्वप्नात रममाण झाला.
गाडीत आता सगळेच झोपले होते. त्याच्या समोरच्या सीटवरील माणूस अजूनही जागाच होता. दोघांची प्रथमच नजरानजर झाली. त्या माणसाने आश्वासक स्मित केले.
"घ्या, पाणी प्या. घाबरलेले दिसताय." तो माणूस म्हणाला.
"थॅंक्स." तो म्हणाला. त्याने समोरच्या माणसाकडून बाटली घेतली आणि घटघटा आपल्या तोंडात रिकामी केली. बाटली त्याला परत दिली आणि त्या माणसाच्या उघड्या दंडावर त्याचं लक्ष गेलं.
त्यावर ’S’ ही खूण होती.
“क्.... काय..... काय? प्..... पण..... पण.....”
“त्याचं काय आहे, तुझं घड्याळ ना पाच मिनिटं पुढे आहे.” एखाद्या लहान मुलाला समजवावं अशा स्वरात समोरचा माणूस म्हणाला. “अजून बाराला पाच कमी आहेत. बाय द वे, तू आत्ताच प्यायलेल्या पाण्यात मी विष घातलं होतं.”
गर्रर्रर्र....................
गर्र गर्र................
डब्यातला पंखा फिरत होता
त्याचबरोबर त्याचं डोकंही
तो स्टन्ड, सुन्न, बधिर डोक्याने त्या समोरच्या माणसांकडे असहाय्य नजरेने पहात होता.....
त्यावेळी त्याच्या डोळ्य़ांसमोर फक्त तिचा चेहेरा होता....
त्याचे डोळे हळूहळू निर्जीव बनत होते.
मरताना त्याला एक गाणं ऐकू येत होतं!
कुठून? कोण जाणे!
बहुधा स्टेशनमधून......,
नाहीतर......................,
त्याच्या मेंदूतून...........’
कुर्बां हुआ, आऽऽ आऽऽऽ,
तेरे इश्क में यूँ,
कुर्बां हुआऽऽ
--
कुलस्य जोशी
kulasya@gmail.com

समाप्त
--
कुलस्य जोशी
kulasya@gmail.com
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
---|
19 comments:
चित्तथरारक कथा.’बॉस’चे एकूण कारनामे पाहून कथानायक शेवटी मरणार हे लक्षात आलं होतंच..पण शेवटपर्यंत निकराने दिलेली झुंज मस्त होती. आपल्या खात्यातले पैसे ’बॉस’ने काढले हे लक्षात येताच ’बॉस’च्या खात्यातले पैसे काढून त्याला काटशह द्यायची आयडीयाची कल्पना लय भारी.
I like the story
it has got speed
u have covered all the events quickly with suspense
all the best for future
@ श्रेया आणि रोहित,
कथा मनापासून वाचून कौतुक केल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.
मला वाटते सुरूवात 2-3 हिंदी सिनेमामधून उचलली आहे.
@ डिप्स, सॉरी, पण अजिबात नाही. संपूर्ण कथा मनाची आहे. गाणी फक्त मुन्नाभाई आणि कुर्बान ची आहेत.
सुरेख आहे कथा! खिळून ठेवते. चोर हुशार असतो म्हणूनच चोरी करू शकतो. चोरावर मोर व्हायचे असेल तर जास्तच हुशारीने काम करायला हवे. मला आवडली कथा . अभिनंदन.
धन्यवाद, निशा
वा ! कथा वाचून मजा आली .सुरवाती पासून शीवथा पर्यणत खिळवून ठेवणारी कथा चणा झाली आहे.
Modifying the comments.Plz ignore previous one. सुरवाती पासुन शेवट पर्य़ंत खिळवून ठेवणारी कथा छान जमली आहे
धन्यवाद , कल्याणी!!! चणा!! हा ,हा!!!!! good one
मस्त कथा
ऋतावरी
धन्यवाद ऋटावरी
khup chhan katha!
kanchan shende
धन्यवाद, कांचन
रोलर कोस्टरवरची मस्त सफर घडली. काय जबरदस्त वेग आहे लिखाणाला.
सुधीर कांदळकर
धन्यवाद सुधीरजी
छानआहे, थोडी फिल्मी आहे, पण तुझया मनाची आहे, वा.......
इथून तुझा सौदागर सुरू होतोय.
धन्यवाद स्वामी. छान खेचलीस!!!
टिप्पणी पोस्ट करा