नामर्द - भाग ५

"ही मुलगी, जिनं तुझं मन राखण्यासाठी माझं वंध्यत्व स्वतःवर घेतलं, ती तुला चेटकीण वाटते?"

आईला एकदम धक्का बसला आणि तिनं वर पाहिलं. भाऊ-वहिनीसुद्धा चकित होऊन पाहायला लागले.

"काय बोलतोयस तू?"
"होय आई. मी नामर्द आहे! तुझा मुलगा. ती वांझोटी नाहीये. तिचे उपकार आहेत तुझ्यावर की ती तुझ्या नामर्द मुलाला सांभाळून घेतेय. हवंतर कुठल्याही डॉक्टराकडून तपासणी करून घे आमची."

त्याच्या आईचा विश्वास बसेना.

"...आणि हीच चेटकीण तुझा मुलगा सहा महिने अंथरूणाला खिळून होता, तेव्हा घर एकहाती सांभाळत होती आणि तुझ्या मुलाची शुश्रुषाही करत होती. तीन वर्षांत तू तिला इतकंच ओळखलंस आई? ह्या बाहेरच्या लोकांच्या सांगण्यावरून तुला तिचे हाल करताना काहीच वाटलं नाही?" आईची मान परत खाली गेली.

"आणि तू अमोल? अबोलीसाठी म्हणून गप्प उभा आहेस. पण लक्षात ठेव, हीच वेळ उद्या अबोलीवर येईल, तेव्हा कुणाकडे कुठल्या अधिकारानं पाहशील?" अमोलचीही मान खाली गेली.

"आणि वहिनी? जाऊ दे! तुमचाही काय दोष? तुम्हा सगळ्यांनाच अंधश्रद्धेचा रोग झालाय." तो जोरात ओरडून जमावाकडे पाहून म्हणाला. "कुणालातरी त्रास देऊन त्या क्रियेचा असुरी आनंद घ्यायचा रोग आहे हा. माणसं नाही आहात, जनावरं झाला आहात तुम्ही सगळे!"

जमाव गप्प होता.

"अरे तुमच्या घरातल्या बायकांवरसुद्धा अशी वेळ येईल उद्या. ह्या असल्या पाखंडी बाबांच्या नादी लागून आपल्या आयुष्याची वाटोळी कशाला करताय? गावात शाळा आहे ती ओस पडलीय आणि तुम्ही लोक चेटकिणीला मारायच्या कार्यक्रमांना गर्दी करताय?" त्याच्या आवाजात दुःख ओतप्रोत भरलेलं होतं. जमाव कधीही उठून येईल ही भीती होती.

"चूक आमच्या पिढीची सुद्धा आहे." तो स्वतःशीच बोलल्यागत म्हणाला, पण एव्हढी स्मशानशांतता होती, की सगळ्यांना ऐकू येत असेल, "आम्ही शहरात गेलो आणि तिकडचेच झालो. तिथे जे शिकलो, ते इथे गावात रूजवण्यात आम्ही कमी पडलो. आमच्याबरोबरच गावाचा विकास घडवण्यात कमी पडलो. कदाचित गावाबद्दलच्या आमच्या कर्तव्यातच कमी पडलो."

आणि एकदम वर बघून तो जोरात म्हणाला, "पण ह्या सगळ्याचा अर्थ हा नाही, की कुठलंही अमानुष कृत्य देवाच्या नावाखाली केलं जावं! ह्या बुवाबाबांच्या शब्दांवर निरपराध व्यक्तिंचे बळी दिले जावेत! मी माझ्या बायकोला ह्या सगळ्याची बळी ठरू देणार नाही." असं म्हणून त्यानं ते पेटतं लाकूड वर धरलं.

एव्हढ्यात पोलिसांच्या गाडीचा सायरन वाजू लागला. जमाव गप्पच होता. गगन तालुक्याहून पोलिसांना घेऊन आला होता. अभयनं जळतं लाकूड खाली फेकलं. आणि पटकन वळून स्मृतीला सोडवलं. स्मृती झाल्या प्रकारानं पूर्ण उन्मळून गेली होती. तिला चक्कर येऊन ती बेशुद्ध झाली.
**********

स्मृतीला हळूहळू शुद्ध आली. तिनं डोळे उघडले, तर सकाळ झाली होती आणि समोर चिंताग्रस्त चेहरा करून अभय बसला होता. तिनं सभोवताली पाहिलं तर ती त्यांच्या शहरातल्या घरी होती.

"इथे?" ती अस्फुट म्हणाली.
तू उठू नकोस बरं, सांगतो सगळं मी.
"पोलिस आले आणि त्यांनी गुरूजी, मुसळेबाई आणि आईला अटक केली."
"काय?"
"हो. आईला त्यांनी समज देऊन सोडून दिलं, कारण गुरूजी आणि मुसळेबाईंचा ट्रॅक रेकॉर्ड निघालाय तालुक्याचा पोलिसांकडे! त्यांचे सगळे कारनामे काल गावासमोरच सांगितले. आई आणि गावकरी दोघांचेही डोळे उघडलेत."
"पण मग आपण इथे?"
"मला तिथे गुदमरल्यासारखं व्हायला लागलं. आईला तुझी माफी मागायची होती. पण मी म्हटलं पुन्हा कधीतरी!"
"तू पण ना! इतकं का करायचं?"
"हे तू बोलतेयस? तुझे किती हाल झालेत ह्या सगळ्यांत! आणि तुला काही झालं असतं म्हणजे?"
"हो मीच बोलतेय. हाल माझेच झालेत ना? मग मी माफ केलं तर तुला काय?"
"बरं बाई माफ कर मला. मला नाही तुझ्याशी भांडता येत."
"आणि मला तुझ्याशी भांडावंसं वाटत नाही!"

समाप्त

--
विद्याधर भिसे
vnb2005@gmail.com


30 comments:

Deepak Parulekar १ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:४० AM  

सुंदर !! अप्रतिम !! खूप छान बाबा !! जाम आवडली !

सौरभ १ नोव्हेंबर, २०१० रोजी ४:२४ AM  

विद्या... अरे... हृदयाला भिडणारं लिहतोस लेका... तुझं नाव 'विद्याधर भिसे'च्या ऐवजी 'विद्याधर भिडे' असं पाहिजे होतं.

Shreya's Shop १ नोव्हेंबर, २०१० रोजी ९:०६ AM  

कथानायक वैद्यकीय दृष्ट्या जरी नामर्द असला तरी कथेत त्याने ते स्विकारलं आहे ही चांगली बाब आहे. प्रत्येक प्रसंगात केवळ घरच्या मंडळींना सामील होऊन तो बाउअकोवर अन्याय होऊ देत नाही, तिच्या पाठीशी उभा रहातो हे ही स्तुत्य आहे. वास्तविक जीवनात असे बदल झाले तर जास्त आनंददायी ठरेल आयुष्य.

Suhas Diwakar Zele १ नोव्हेंबर, २०१० रोजी १०:११ AM  

बाबा, खूपच छान...भिडली रे काळजाला...अप्रतिम

mau १ नोव्हेंबर, २०१० रोजी १०:२७ AM  

विभी,अरे किती सुंदर लिहिले आहेस...फारच छान !!!

Anagha १ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:५० PM  

सुंदर विद्याधर. खरंच, सौरभ म्हणतोय ते बरोबरच आहे! विद्याधर 'भिडे' नाव चांगलंच शोभेल तुला! :)

Nisha ७ नोव्हेंबर, २०१० रोजी १०:०७ PM  

आपल्यातल न्यून पत्नीसाठी उघड करणारा पती प्रथमच दिसला. असा वारंवार प्रत्यक्ष जीवनात दिसला तर? पण असे होत नाही. लिहिलीय मात्र सुरेख . आवडली. अभिनंदन.

saisakshi १६ नोव्हेंबर, २०१० रोजी ३:०६ PM  

खरच आवडली कथा.. असल्या अंधश्रद्धा आपणच खोडून काढायला हव्यात वेळोवेळी. आजही दोष पुरुषात असला तरी बाईला च वांझ ठरवल जात अनेक ठिकाणी. अन् लोक लजेस्तवर स्त्री पण हे निमुट पणे मान्य करते. स्वतः कमीपणा घेऊन आपल्या नवर्‍याला वाचवते..

THEPROPHET २९ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:३१ AM  

सौरभ,
:) लहानपणी कधीतरी बाय मिस्टेक कुणीतरी माझं नाव 'भिडे' असं वाचलं होतं.. पण त्यापेक्षा हे ज्या कंटेक्स्ट मध्ये म्हणालास ते आवडलं. ;)

THEPROPHET २९ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:३२ AM  

श्रेयाताई,
वास्तविक जीवनात कुठेतरी बदल घडले असतील आणि घडत असावेत अशीच इच्छा आहे! :)

THEPROPHET २९ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:३३ AM  

सुहासा,
खूप धन्यवाद भावा!!!

THEPROPHET २९ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:३४ AM  

माऊताई,
:):):)
आवडली ना तुला!!!

THEPROPHET २९ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:३५ AM  

अनघा,
तसा मी बर्‍याच ठिकाणी नडतो आणि भिडतो..पण काळजाला भिडणं नेहमीच सगळ्यांत चांगलं :)
आभार!

THEPROPHET २९ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:३८ AM  

निशा,
कुणीतरी खरंच असा असेल आणि नसला तर यापुढे होईल अशी आशा आहे... :)
आभार!!

THEPROPHET २९ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:४० AM  

साईसाक्षी,
खरंच..अंधश्रद्धा निर्मूलन आपल्यापासूनच सुरू झालं पाहिजे तरच बदल घडू शकेल..
खूप धन्यवाद!

अनामित,  २९ जून, २०११ रोजी १२:२८ PM  

khup chan. katha avadali

अनामित,  २४ नोव्हेंबर, २०११ रोजी ५:२७ PM  

खूपच बालिश कथा आहे. इतरांनी कसे काय इतकी स्तुती केली ? जरा चांगलं वाचा लेकहो. तुम्हाला जी. ए वगैरे माहित नाही वाटतं. आणि भिसे साहेब चांगलं लिहिता यायला लागल्यावर पोस्ट करत जा. नाहीतर अर्ध्या हळकुंडाने पिवळे व्हाल आणि सुमारच लिहित राहाल

Kanchan Karai (Mogaraafulalaa) २४ नोव्हेंबर, २०११ रोजी ७:५१ PM  

अनामित, तुम्हाला कथा आवडावी की न आवडावी हा तुमचा प्रश्न आहे. इतरांनाही तुमच्यासारखंच वाटलं पाहिजे ही जबरदस्ती का? भिसे साहेबांनी चांगली, सुमार जशी सुचेल तशी कथा लिहिली आणि प्रसिद्ध करण्याची हिम्मतही दाखवली पण तुम्हाला मात्र प्रतिक्रिया देताना स्वत:चं केवळ नाव लिहिण्याएवढीही हिम्मत असू नये ना! नागपुरात हेच शिकलात वाटतं? असो.

अशाच सुमार कथा वाचण्याकरता आपण वारंवार मोगरा फुलला ई दीपावली अंकाला भेट द्या. या वर्षीच्या ई दीपावली अंकाची लिंक आपल्या माहितीसाठी देत आहे.

http://mfda2011.blogspot.com

येथेही आपण प्रतिक्रियेची मुक्ताफळे उधळल्यास वाचकांना दिवाळीचा बोनस मिळाल्याचं समाधान मिळेल.

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.