उल्हास भिडे

नमस्कार,

माझ्याबद्दल थोडेसे.

मी उल्हास रामचंद्र भिडे. जन्मापासून मुंबईत राहतो. गेल्या काही वर्षांपासून मुंबई-बोरीवली इथे स्थायिक. महानगरपालिकेच्या संगणक विभागातून निवृत्त. एक सामान्य माणूस. विधात्याने जे आयुष्य दिलं आहे, ते मला आनंदात, खेळकरपणे जगायला आवडतं.

साधारण अडीच-तीन वर्षांपूर्वी Orkut वरील ‘Zee मराठी’ आणि ‘असंभव विथ सतीश राजवाडे’ या communities मधून माझ्या Social networking ला सुरवात झाली. तिथे चालणार्‍या चर्चेत नियमित भाग घेत असल्यामुळे अनेक लोकांशी परिचय झाला. ‘मराठी मालिकांमधल्या पात्रांचे उखाणे’ तसच असंभव मालिकेतील पात्रांची कविता स्वरूपात ‘मनोगते’ मी संबंधित Orkut communities वर लिहिली. माझ्या लेखनाला लोकांची दाद मिळाली आणि त्यामुळेच माझ्यातील कविता करण्याचा सुप्तगुण जागृत झाला. (म्हातारपणात बाळसं :D). मला प्रोत्साहित करणार्‍या सर्व नेट मित्रांचा मी ऋणी आहे. मी माझं लेखन कुठेतरी एकत्र स्वरूपात संग्रहित करावं, असा आग्रह माझ्या काही net friends नी केल्यामुळे माझा ब्लॉग आकारास आला. विशेष म्हणजे ब्लॉगचं, ’संचित’ हे नामकरण देखील माझ्या एका net friend नेच केल आहे.

आपले विचार व्यक्त करायला, आवडीच्या विषयांवर चर्चा करायला social networking हे एक उतम साधन आहे. दर्जेदार मराठी ब्लॉग्स वाचणं, त्यातील लेखनावर प्रतिसाद देणं या गोष्टींचा अंतर्भाव Orkut, FB, Chatting याबरोबरीने माझ्या social networking मध्ये सहजगत्या झाला. या माध्यमातून अनेक मित्र जोडले गेले, अनेकांमधल्या गुणांचा परिचय झाला. Social networking हा माझा छंदच नव्हे तर जीवनाचा अविभाज्य भाग कधी बनला हे माझं मलाच कळल नाही.

--
उल्हास भिडे
ulhasbhide@yahoo.co.in
उप-संपादक
मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१०

4 comments:

सौरभ १ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:४४ AM  

उत्साह असावा तर असा!!! तुमचे नेटवर्क आणि लिखाण असेच बहरत राहो... दिवाळीच्या शुभेच्छा :)

Suhas Diwakar Zele १ नोव्हेंबर, २०१० रोजी ७:४५ AM  

भिडेकाका, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा...तुमची मेहनत दिसून येतेय...
आणि हो अंक खूप खूप आवडला.... :)

ulhasbhide १ नोव्हेंबर, २०१० रोजी ४:२८ PM  

सौरभ, सुहास
धन्यवाद !
तुमच्यासारख्या नेट-मित्रांच प्रोत्साहन हाच उत्साहाचा उगम आहे.

ulhasbhide २ नोव्हेंबर, २०१० रोजी ८:५२ AM  

सर्वांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

‘मोगरा फुलला’ वरचा तुमचा आजवरचा लोभ, अंकासाठी साहित्य पाठवून अनेकांनी घेतलेला प्रत्यक्ष सहभाग, संपादक मंडळाने कांचनच्या कुशल नेतृत्वाखाली पार पाडलेली जबाबदारी, तसंच असंख्य जाल-मित्रांच्या सदिच्छा; या सर्वाच फलित म्हणजे हा आपला ’मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१०’.

इतका सारा पाठिंबा असल्यामुळेच मी माझा खारीचा वाटा उचलू शकलो.
लोभ आहेच, तो वृद्धिंगत व्हावा.
...... उल्हास भिडे

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.