सोया-व्हीट नानकटाई

या नानकटाईमध्ये मैद्याचा वापर न करता सोयाबिनचे पिठ आणि गव्हाचे पिठ वापरले आहे.

नग: २२ ते २३
वेळ: २५ ते ३० मिनीटेसाहित्य:
८ टेस्पून अनसॉल्टेड बटर (१/२ कप)
६ टेस्पून पिठी साखर
१/२ कप गव्हाचे पिठ
१/२ कप सोयाबिन पिठ
१/४ टिस्पून बेकिंग पावडर
१/४ टिस्पून वेलची पावडर
२ टेस्पून पिस्त्याचे काप

कृती:
१) नानकटाई बनवण्यापूर्वी बटर २ तास फ्रिजबाहेर काढून ठेवावे म्हणजे एकदम मऊसर होईल. एका मध्यम आकाराच्या खोलगट ताटलीत बटर आणि साखर घ्यावी. आणि मिश्रण हलके होईस्तोवर जोरजोरात फेसावे.

२) ३५० डीग्री F (१७५ डीग्री सेल्सियस) वर ओव्हन प्रिहीट करावे.

३) बेकिंग ट्रे ला तूपाचा किंवा बटरचा हात लावून तयार ठेवावा. वरील प्रमाणासाठी साधारण २ ट्रे लागतील. एकच ट्रे असल्यास दोन विभागात नानकटाई बनवावी.

४) सोयाबिन पिठ, गव्हाचे पिठ, वेलची पावडर आणि बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्यावी. चाळणीत जर पिठाचे गोळे अडकले असतील तर ते फोडून घ्यावेत. चाळलेले पिठ, बटर-साखरेच्या मिश्रणात घालावे आणि हाताने मळावे. व्यवस्थित गोळा तयार करावा (कदाचित एखादा चमचा पिठ वाढवावे लागेल).

५) तयार गोळ्याचे साधारण २२ ते २३ समान भाग करावे (१ इंच). प्रत्येक गोळा एकमेकापासून २ इंचाच्या अंतरावर ठेवावा. एका ट्रेमध्ये साधारण १२ ते १४ गोळे बसतील. प्रत्येक गोळ्यावर पेढ्याला लावतो तसे पिस्त्याचे काप लावून चेपावे.

६) ओव्हनच्या मधल्या रॅकमध्ये ट्रे ठेवावा व साधारण १२ ते १४ मिनीटे बेक करावे. बेक केल्यावर ट्रे बाहेर काढावा आणि गार होवू द्यावा. १५ मिनीटांनी खुसखूशीत अशा नानकटाई खाण्यासाठी तयार होतील.

टीपा:
१) मिठ नसलेले बटर वापरावे. बटर नसल्यास मऊसूत घरगूती लोणी वापरले तरी चालेल.
२) नानकटाईच्या मिश्रणात बदाम, काजू, पिस्त्याचे पातळ काप मिक्स केले तरीही छान चव येते.
३) नानकटाईसाठी मळलेला गोळा एकदम तुपकट नसावा. जर बटर जास्त वाटत असेल तर चमचाभर पिठ घालावे. कारण खुप तूपकट गोळा बेक केला तर नानकटाई एकदम बसक्या होतात. कणकेला मळतो इतपत गोळा घट्ट असला पाहिजे.

--
वैदेही भावे
chakalionline@gmail.com

इतर पाककृती:

3 comments:

मुक्त कलंदर १ नोव्हेंबर, २०१० रोजी ३:२७ PM  

करून बघतो.. दिवाळीच्या फराळात एक नवीन भर..

Suhas Diwakar Zele ३ नोव्हेंबर, २०१० रोजी ६:५० PM  

हा प्रकार कधी जमलाच नाही :(
पण आता तुम्ही दिलेल्या कृतीने परत एकदा करून बघेन.. :)

Vaidehi Bhave ८ नोव्हेंबर, २०१० रोजी ११:४३ PM  

धन्यवाद

@ सुहास
नक्की करून पहा, छान होतात नानकटाई..

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.