तू तेव्हा तशी

तु फार वेगळीच दिसतेस..

पहिल्यांदाच मी तुला इतक्या जवळून पाहतोय...

शांत,निर्विकार्,निच्छल..

सारं काही विसरुन निद्रेच्या अधिन झालेली तू!!!

हाताची उशी करुन खडकाच्या कुशीत शिरलेली तू!!

नेहमी हसत,बागडत, खेळत राहणारी तू!!

पहिल्यांदाच मी तुला अशी शांत विसावलेली पाहतोय....

नेहमी खळखळणार्‍या झर्‍यासारखी तू!!!

मी पहिल्यांदाच संथ वाहणार्‍या नदीसारखी पाहतोय...

किति तरी वेळ मी तुला पाहतोय... तुझा चेहरा मी माझ्या डोळ्यांत भरुन घेतोय... तुझ्या नकळत तुझे काही स्नॅप्स घेतोय...

माझं तुला पाहत राहणं तुला जाणवतयं का??? कदाचित नाही...मलाही तेच हवयं...

थांब!! मी तुला इतक्यात ऊठवणार नाहीए...

असं वाटतयं हा क्षण इथेच थांबावा, सारं विश्व इथेच स्थिर व्हावं.. आणि मी तुला असंच पाहत राहावं..तु उठेपर्यंत...

तुझ्या अंगावरुन वाहणार्‍या वार्‍याचा मला हेवा वाटतोय.. उशीसाठी घेतलेल्या तुझ्या बाहुंचा मला हेवा वाटतोय, तु ज्या खडकाच्या कुशीत विसावलीस त्या खडकाचाही मला हेवा वाटतोय!!

तुझे लयबद्ध श्वास माझ्या श्वासांचा वेग वाढवत आहेत...

तुझ्या केसांवरुन हात फिरवण्यास अधिर झालेल्या माझ्या हातांना मी आवरतं घेतो, माझ्या स्पर्शाने तु जागी झालीस तर???

नाही मला अजुन तुला बघायचयं..

तुला तसं बघुन मला एकदम शाळेत असताना कूठेतरी वाचलेली एक कविता आठवलीए,

"रानात एकटे पडलेले फुल" काही शब्द विसरलोय पण ती अशी होती;

वन सर्व सुगंधित झाले, मन माझे मोहुन गेले किती तरी.

मी सारे वन हुडकिले,फुल कोठे न कळे फुलले मज तरी...

स्वर्गात दिव्य वृक्षास्,बहर ये खास; असे कल्पिले,असे कल्पिले,

मन माझे मोहुन गेले किती तरी...

परी फिरता फिरता दिसले फुल दगडाआड लपाले,

लहानसे,दिसण्यास फार ते साधे, परि आमोदे.

मी प्रेमे वदलो त्यासी, का येथे दडुन बसशी तू प्रिय फुला??

तु गडे फुलांची राणी, तुला गे कोणी धाडीले वनी??

मन माझे मोहुन गेले किती तरी...

ते लाजत लाजत सुमन, म्हणे मज थोडके हसुन.

"निवडले प्रभुने स्थान, रम्य उद्यान, तेच मज झाले, तेच मज झाले"

मन माझे मोहुन गेले किती तरी...."

नको, तु जागी होउ नकोस..अजुन थोडा वेळ तरी!! माहीत नाही हा क्षण परत येइल की नाही...मला आत्ताच तो क्षण जगु दे!! ...

तुला ऐकुही जाणार नाही इतक्या हळू आवाजात मी तुला हाक मारतोय..ऐकु येतेय का तुला ???

उशीसाठी घेतलेल्या तुझ्या बाहुला स्पर्शुन मी तुला उठवतोय; तुझ्या आणि माझ्याही मनाविरुद्ध...

तु जागी झालीस पण झोप तुझ्या चेहर्‍यावरुन जात नाहीए...डोळे अजुनही झोपेतुन बाहेर यायला तयार नाहीत...

उठुन बसताना तुझे बांधलेले केस मो़कळे झालेत...पण तुला त्याची फिकीर नाहीए... झोपेतच तु ते सावरण्याचा प्रयत्न करतेस..

नको ना, अशीच छान दिसतेस....

माहीत नाही मी आता या रुपात तुला डोळे भरुन पाहीन की नाही??? मी फटाफट दोन तीन स्नॅप्स घेतोय...

दोन्ही हात पसरुन....तु .....

.

.

.

.

.

मस्तपैकी एक जांभई देतेस....

तुझी झोप जातेय मला काही स्वप्ने देउन !!!!

-
दीपक परूळेकर
deeheart@gmail.com

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.