सूचना आणि सल्ले


या अंकातील एखादी लिंक उघडत नसेल किंवा एखादा साहित्यप्रकार वाचण्यास अडचण येत असेल तर आम्हाला अवश्य सांगा.

तसंच, आपल्याला इतर कोणत्याही प्रकारचा सल्ला अथवा सूचना द्यावयाची असल्यास इथे अवश्य लिहा.

धन्यवाद.

मोगरा फुलला ई-दीपावली अंक समूह

12 comments:

Unique Poet ! १ नोव्हेंबर, २०१० रोजी ११:४५ AM  

नमस्कार ,कांचनताई !
दोन मला महत्वाच्या वाटणार्‍या सुचना आहेत.
१ }तुम्ही दीपावली अंकाचा जो विजेट कोड आता दिला आहे,त्यात थोडी चूक झाल्यामुळे अंक उघडत नाही. विजेट कोड मध्ये दिलेली लिंक - hhttp://mfdiwaliank.blogspot.com/ अशी आहे. एक h जास्त पडला आहे.

२} अंकामध्ये ’प्रतिक्रिया देण्यासाठी मराठीतून टंकलेखनाचा पर्याय उपलब्ध आहे ’ - हा पर्याय एक तर काम करत नाही , किंबहूना मला तरी कळले नाही कसा वापरायचा , मी खालचा पर्याय + बरहा वापरले .
सदीच्छा !
- समीर पु.नाईक

Unique Poet ! १ नोव्हेंबर, २०१० रोजी ११:५७ AM  

प्रथम सुचना ही G-Buzz वर दिलेल्या कोड संदर्भात आहे,
क्षमस्व !
- समीर पु.नाईक

Kanchan Karai (Mogaraafulalaa) १ नोव्हेंबर, २०१० रोजी ९:३३ PM  

समीर,
खालचा जो पर्याय आहे तोच मराठी टंकलेखनाचा पर्याय आहे. आणि तो बराहा चा नाही क्विलपॅडचा पर्याय आहे. :-)

मी Buzz वरील चूक सुधारली आहे. दोन्ही प्रतिक्रियांसाठी आभार.

अनामित,  २ नोव्हेंबर, २०१० रोजी ३:१३ AM  

एखाद्या लेखावर इतर लोकांनी दिलेले अभिप्राय दिसत नाहीत.
ते दिसण्यासाठी काय करता येईल ?

अनामित,  २ नोव्हेंबर, २०१० रोजी ३:३३ AM  

ब्लॉंगर व्यतिरिक्त इतर लोक आपला प्रतिसाद कसा देऊ शकतात ? व तो सर्वाना वाचावयास कसा मिळतो ?

Kanchan Karai (Mogaraafulalaa) २ नोव्हेंबर, २०१० रोजी ११:३३ AM  

नमस्कार अनामित,

एखाद्या लेखावर दिलेल्या प्रतिक्रिया वाचण्यासाठी ब्लॉगचं संपूर्ण पेज स्क्रोल करून वाचावं लागतं, म्हणजे प्रतिक्रिया आपोआप दिसतात आणि वाचताही येतात. लेखाच्या शेवटी किती प्रतिक्रिया आल्या आहेत, त्याचा आकडा डावीकडच्या कोपर्‍यात स्पष्टपणे लिहिलेला असतो. जर प्रतिक्रिया मिळालेल्या नसतील, तर 0 Comments असं स्पष्टपणे नमूद केलेलं असतं. ते वाचलं की समजतं. या पोस्टखाली दिलेली स्वत:ची प्रतिक्रिया जर आपल्याला स्वत:ला वाचता येत असेल, तर इतर लेखांखाली मिळालेल्या प्रतिक्रिया आपल्याला वाचता यायलाच हव्यात. अन्यथा ताज्या प्रतिक्रिया वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Kanchan Karai (Mogaraafulalaa) २ नोव्हेंबर, २०१० रोजी ११:३४ AM  

अनामित,
ब्लॉग व्यतिरिक्त प्रतिक्रियांसाठी संपर्क म्हणून दिलेला ईमेल आयडी वापरा. तो इथेच दिला आहे. उजवीकड्च्या साईडबार्समधे शोध घ्या.
धन्यवाद.

अपर्णा २ नोव्हेंबर, २०१० रोजी ११:४७ AM  

अंक सुंदर झालाय यात काही वादच नाहीये...त्याच बाह्यरूप आणि अंतरंग दोन्ही छान....तुझी क्रिएटीव बाजू पुन्हा एकदा चमकतेय....
फक्त एकाच सूचना मी खर म्हणजे कथा आणि कविता हे प्रकार फारसे वाचत नाही..पण दिवाळी अंक असेल तर सगळच चाळल जात...मला वाटत असे फक्त भाग एक वगैरे सर्वसाधारण दिवाळी अंकात देत नाहीत न?? की मी चुकून अर्धीच कथा वाचायला घेतली की आणखी काही गैरसमज.....
कळावे लोभ असावं आणि सगळ्या टीमच पुन्हा एकदा अभी आणि नंदन....

Kanchan Karai (Mogaraafulalaa) २ नोव्हेंबर, २०१० रोजी ११:५५ AM  

अपर्णा, प्रशंसोत्गारांसाठी आभार.

भाग १ जिथे संपतो आहे, तिथे खालीच सुहासच्या आयडीजवळ पान १ व २ उपलब्ध आहे ना. जर २ वर क्लिक केलंस तर पुढचा आणि शेवटचा भाग वाचता येईल. या दिवाळी अंकात कुठलीच कथा क्रमश: नाही केवळ कथेच्या लांबीनुसार, वाचकांना नॅव्हिगेशन सोपं जावं म्हणून भाग पाडले आहेत

अनामित,  २ नोव्हेंबर, २०१० रोजी ७:०९ PM  

मी माझया मै त्रिणी च्या लेखा वर comment दिली होती. ती तिला दिसत नाहीये. काय क रावे लागेल मला ?

Kanchan Karai (Mogaraafulalaa) २ नोव्हेंबर, २०१० रोजी ७:१२ PM  

या अंकावरील प्रत्येक प्रतिक्रियेची नोंद होते आहे. तुम्ही प्रतिक्रिया दिलीत, ती पोस्ट झाली नसावी कारण माझ्याकडे तशी नोंद आलेली नाही. तुमच्या मैत्रीणीचा लेख कुठला हे सांगण्याची तुम्ही तसदी घेतलेली नाही, त्यामुळे शोधू शकत नाही. तुम्हाला पुन्हा प्रतिक्रिया द्यावी लागेल.

sachin sawant,  ९ जानेवारी, २०११ रोजी ६:५४ PM  

मोगरा फुलला चा अंक खूप सुंदर आहे
या ब्लॉग चा जे ओळखचिन्ह किंवा फॉण्ट आहे तो कॅलिग्राफी ने manualy बनवला असता तर फार सुंदर दिसला असता.

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.