IE Care च्या मदतीने Internet Explorer ची करुया दुरुस्ती

ब्राऊसर्सच्या जगात कितीही क्रांती झाली असली, तरी अजूनही Internet Explorer(IE) हा ब्राऊजर सर्वत्र वापरला जातो.IE पेक्षा कितीतरी पटीने प्रगत ब्राऊसर्स हल्ली उपलब्ध आहेत, याची काही उदाहरणे द्यायची झालीच तर Firefox, Opera, Safari, Google Chrome शिवाय अजूनही लहान मोठे असे बरेचसे ब्राऊसर्स होतील. नवीन ब्राऊसर्स उपलब्ध असले तरी IE हे आपल्याला कधी ना कधी वापरावेच लागते. याचे मुख्य कारण म्हणजे काही साईट्स या फक्त IE लाच सपोर्ट करतात म्हणजे अन्य ब्राऊसर्स असूनही नसल्यासारखे वाटू लागतात. तर काही मंडळींना नवीन ब्राऊसर्स पचनी पडत नसल्याने ते फक्त आणि फक्त IE वरच विसंबून असतात.

काळानुरुप IE चे स्वरुप बदलले, आता तर IE ची ९ वी आवृत्ती ही दाखल झाली आहे, त्यात अनेक सुविधा आल्या आहेत. पण काही बेसिक किंवा मुलत:च असणारे लहान मोठे दोष मात्र त्यात अजुन जसेच्या तसे आहेत. काहींना त्या त्रुटी जाणवतात, तर काहींना वाटते की आपल्या संगणकात व्हायरस आलाय, म्हणुन IE ला काही होत असेल. पण खास IE मध्येच काही त्रुटी आल्या तर काय करायचे, हा प्रश्न प्रत्येकाला भेडसावतो आणि IE मधल्या त्रुटी किचकट असतात म्हणूनच तर कोणी शक्यतो हा ब्राऊजर वापरत नाही किंवा फार कमी वापरतात.

ही समस्या मोडीत काढण्यासाठी काही सॉफ्टवेअर आहे का, याचा शोध इंटरनेटवर घेता घेता एक सॉफ्टवेअर हाती लागले. काही प्रमाणात IE मधील त्रुटी (Errors) हे नक्कीच दूर करते. म्हणजे निदान बुडत्याला काठीचा का होईना पण आधार मिळेल, हे तरी बरे नाही का ? या सॉफ्टवेअर नाव आहे IE Care. नावातच सगळे काही आहे. बाकी जास्त काही लिहायची गरज नाही पण तरीही IE Care काय आहे व ते कसे वापरायचे ह्यावर दृष्टिक्षेप म्हणुन याची विस्तारीत माहिती देत आहे. या सॉफ्टवेअरची वैशिष्ट्ये हे सॉफ्टवेअर रन केल्यावरच कळतील. आधी आपण इन्स्टॉलेशन प्रक्रिया पाहूया.

IE Care हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

वरील लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला खालीलप्रमाणे एक सेट अप फाईल मिळेल.

त्याच सेटप फाईलवर डबल क्लिक करून ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा.

ते इन्स्टॉल कसे करायचे हे मी खालील चित्रांद्वारे अनुक्रमे दाखवत आहे:


वरील शेवटच्या विंडोतील Finish या बटणावर क्लिक केले की तुमचा इन्स्टॉल्ड प्रोग्राम रन होईल.

प्रथम दिसणारी विंडो खालीलप्रमाणे असेल. त्यात तुम्हाला PC Brother System नावाचे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करयचे आहे का, असे विचारणा करणारी एक लहान upgrade नावाची उप-खिडकी दिसेल. (PC Brother System हे एक सिस्टिम मेंटेनन्स सॉफ्टवेअर आहे, म्हणजेच पीसीतील रजिस्ट्री फॉल्ट्स दुरुस्त करणे, डिस्क डिफ्रेग करणे, टेंपररी फाईल्स नष्ट करणे, रॅम ऑप्टीमाईज करणे इत्यादी कामे हे सॉफ्टवेअर करते तुम्हाला हवे असल्यास Yes या बटणावर क्लिक करून तुम्ही ते सॉफ्टवेअर डाऊनलोड करून इन्स्टॉल करू शकता.) तुर्तास आपण No वर क्लिक करुया.आपल्या IE मधल्या त्रुटी सर्वसाधारण आपल्याला माहीतच नसतात म्हणून आपण Repair या टॅगअंतर्गत Select All निवडायचे आणि Repair वर क्लिक करायचे. खालील चित्रात दाखवले आहे अगदी तसेच.Repair वर क्लिक केले की IE मधील शक्य तितक्या सगळ्या त्रुटी (Errors) दुरुस्त होतात आणि Errors दुरुस्त झाल्या संबंधीचा रिपोर्ट समोर दिसतो. माझ्या IE ला असलेल्या Errors दुरुस्त केल्यावर हा आलेला रिपोर्ट.Back या बटणावर क्लिक केले की पुन्हा मूळ विंडोवर जाता येते. अशाच प्रकारे Cleaning या टॅग अंतर्गत IE ची History, cookies, Addresses आणि Temporary files क्लीन करु शकतो. यासाठी Cleaning या टॅग वर क्लिक करून पुन्हा Select All करा आणि Clean वर क्लिक करा.ब-याच वेळेला आपल्या IE मध्ये खास करून हल्लीच्या नवीन IE (म्हणजेच IE ७ ते ९ च्या आवृत्त्या ) मध्ये बरेच plugins असतात. आता plugin म्हणजे काय, हे थोडक्यात सांगायचे झाले तर इंटरनेटवरील काही विशिष्ट प्रकारच्या हालचालींसाठी लागणारी अगदी छोटी सॉफ्टवेअर्स जी कधी कधी आपल्या नकळत इन्स्टॉल होतात, तर कधी कधी ती करावी लागतात. उदाहरण द्यायचे झालेच तर Adobe flash player किंवा मग yahoo , google टूलबार वगैरे plugins असतात. कधी कधी या प्लगइन्स मध्ये देखील त्रुटी असतात, ज्यामुळे IE ला धोका पोहचतो अथवा ते नीट कार्य करत नाही. काहींना तर हे प्लगइन्सच नको असतात. अशांसाठी सोपा उपाय म्हणजेच IECare मधला हा plug-ins चा पर्याय होय. Plug-ins या टॅगवर क्लिक करून खालील Select All हा पर्याय निवडून Clear या बटणावर क्लिक केले की सगळे प्लगीन्स IE मधून निघुन जातील.

सूचना: ज्यांना प्लगीन्स हवी आहेत त्यांनी कृपया हा टॅग वापरू नये.IECare चे मुख्य आणि शेवटचे वैशिष्ट्य अतिशय महत्त्वाचे असून ते Security या टॅग अंतर्गत आहे. Security टॅगवर क्लिक केले की तो प्रथम तुम्हाला बंद म्हणजेच off दिसेल आणि आता चित्रात हिरवा दिवा चालू दिसतोय, तुम्हाला तो लाल दिसेल. दिवा हिरवा करण्यासाठी तुम्हाला Turn on वर क्लिक करावे लागेल.Turn on वर क्लिक केल्यावर उजव्या हाताला काही साईट्स ची नावे दिसतील या Malicious वेबसाईट्स आहेत. ज्या तुमच्या संगणकाला थेट धोका निर्माण करू शकतात. हे सॉफ्टवेअर अशा साईट्स आपोआपच ब्लॉक करते, म्हणजे तुम्ही या साईट्स वर चुकून जरी गेलात तरी page cannot be displayed ची एरर येईल. आहे की नाही गम्मत !

IE Care हे सॉफ्टवेअर फक्त IE मधिल त्रुटी दुरुस्त करण्यासठी आणि IE ची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आहे. हे भन्नाट सॉफ्टवेअर नक्कीच वापरून पहा आणि कसे वाटले तेही मला सांगा.

--
प्रथमेश शिरसाट
prathmesh.shirsat@gmail.com

6 comments:

Suhas Diwakar Zele २ नोव्हेंबर, २०१० रोजी १०:२५ AM  

छान माहिती..जे IE वर विसंबून असतील त्यांना खूप उपयोगी...

pranay २ नोव्हेंबर, २०१० रोजी २:५० PM  

खूप चांगले काम केले मित्रा आणखीन काही चांगल्या गोष्टी असतील तर सांग

अनामित,  ६ नोव्हेंबर, २०१० रोजी २:१३ AM  

IE Care - spyware नी भरले नाही कशावरून ?

Unknown ६ नोव्हेंबर, २०१० रोजी ९:०९ AM  

@ रोहिणी आणि सुहास धन्यवाद ! लेख वाचल्याबद्दल आभारी आहे

@ प्रणय पुढील अंकात नक्कीच याहून वेगळा लेख असेल.

@ अनामित, मी सोफ़्टवेअर Spyware doctor आणि तब्बल ५ Anti spyware softwares वर टेस्ट केले अहे ... बिनधास्त वापरा...

अनामित,  १३ जानेवारी, २०११ रोजी ६:३० PM  

khupach chan mahiti dili aahe tyabaddal aabhari aahe

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.