ओरिगामी हंस

साहित्य:
१. १६ १६ A-4 च्या आकाराच्या कागदाची पाने
२. कात्री


कृती:
१. प्रथम प्रत्येक पानापासून आकृती क्रमांक १ मध्ये दाखवल्याप्रमाणे ३२ आयताकृती तुकडे करुन घ्यावेत. तुकडे करण्यासाठी कागदाच्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे ४ उभ्या आणि ८ आडव्या एकसंध घड्या कराव्यात. कात्रीने कागद घड्यांवर कापुन घ्यावा. एका कागदापासून ३२ आयताकृती तुकडे कापून तयार होतील. असे १६ कागदांचे एकूण ५१२ आयताकृती तुकडे तयार होतील आणि त्यातील ४८४ आयताकृती तुकडे हंस बनवायला लागतील.२. त्यानंतर प्रत्येक आयताकृती तुकडयापासून वरील चित्रात (आकृती २a ते आकृती २h) दाखवल्याप्रमाणे त्रिकोण दुमडून घ्यावेत. असे एकून ४८४ त्रिकोण बनवायचे आहेत. हे जरा वेळखाऊ काम आहे. पण चिकाटी सोडू नका.

३. आता मुख्य काम आहे ते सर्व त्रिकोण जोडण्याचे आणि हे अतिशय मह्त्वाचे काम आहे. कारण ह्याशिवाय आपला हंस पूर्ण होणार कसा.

४. प्रथम ३० आणि ३० त्रिकोण एकमेकांत आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे एकमेकांत अडकवून पाया तयार करुन घ्या. (आकृती-३)

५. तेच तत्व वापरुन आकृतीत दाखवल्याप्रमाणे ६ थर पूर्ण करा. त्यासाठी एकूण १८० त्रिकोण लागतील. (आकृती-४, ५, ६, ७)

६. आता पाया पुर्ण केल्यावर त्यावर पंख, शेपूट आणि चोच बसवायची आहे.७. प्रथम एका बाजुला १२ आणि दुसर्या बाजुला १२ असे त्रिकोण वर दिलेल्या आकृतीप्रमाणे (आकृती- ८) जोडा. त्यावर ११, १०, ९, ८, ७, ६, ५, ४, ३, २, १ असे त्रिकोण अडकवून पंख पूर्ण करावेत.
(आकृती- ९, १०, ११)८. शेपटी बनवण्यासाठी १० त्रिकोण लागतील. दोन पंखांच्या मध्ये प्रथम ४ त्रिकोण बसवून त्यावर ३, २ आणि १ त्रिकोण बसवून आकृतीत (आकृती-१२) दाखवल्याप्रमाणे शेपटी पूर्ण करा.९. चोच बनवण्यासाठी एकूण ३० त्रिकोण लागतील. ३० त्रिकोण एकमेकांत अडकवून आकृतीत (आकृती- १३) दाखवल्याप्रमाणे शेपटीच्या समोर बसवा आणि हंस बनवून तयार.१०. आता घरटे बाकी आहे. त्यासाठी ५० त्रिकोण एकमेकांत अडकवून आकृतीत दाखवल्याप्रमाणे वर्तुळाकार घरटे बनवा.आता आपला ओरिगामी हंस तयार आहे. तो बनवल्याबद्दल स्वत: ची पाठ थोपटून घ्या.

अधिक सहजपणे समजावे म्हणून युट्यूबवरील ओरिगामी हंसाची ध्वनिचित्रफित येथे दिली आहे.


सौजन्य: KleinerChaotBerlin

--
भारत मुंबईकर
bharat.mumbaikar@gmail.com
(संकलक कलाकार)

5 comments:

Suhas Diwakar Zele १ नोव्हेंबर, २०१० रोजी ९:३७ AM  

भारता, मानला तुला..
एकदम सहीच. लवकरच स्वत:ची पाठ थोपटून घेणार बर मी:)

Shreya's Shop १ नोव्हेंबर, २०१० रोजी ११:०३ AM  

भामुची ही कलाकृती आधीच पाहिलेली होती. पण त्यामागे इतके श्रम असतील आणि इतकं डोकं वापरावं लागेल हे माहित नव्हतं. येरागबाळ्याचे हे काम नव्हे.

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.