अप्सरा गेली संपावर

समाधानी नव्हती पगारावर
इन्क्रिमेंट नव्हते वर्षांवर
नव्हते धोरण बड्त्यावर
एकमत होईना सुट्ट्यांवर
अप्सरा गेली संपावर

फ्रीज टीव्ही हप्त्यांवर
कर्जाचा डोंगर माथ्यावर
मेळ बसेना खर्चावर
निष्फळ बैठका चर्चांवर
अप्सरा गेली संपावर

भागत नव्हते बिदागीवर
नाराजी होती इंद्रावर
घेत नव्हता मनावर
भलतीच तफावत पृथ्वीवर
अप्सरा गेली संपावर

चमकते सोनाली--खानविलकर
कौतुकाचा वर्षाव नटरंगवर
नकली कमविते लाखावर
असली येतेय रस्त्यावर
अप्सरा गेली संपावर

मोहिनी पडली देवांवर
नेट कनेक्षन स्वर्गावर
वेळ घालवतात चॅटींगवर
रमलेत क्रिकेट बेटिंगवर
अप्सरा गेली संपावर

कंटाळली इंद्रसभा अप्सरावर
त्याच जुन्या डान्सवर
जाहले फिदा राखीवर
पाठवतील अप्सरा धर्तीवर
अप्सरा अजूनही संपावर

--
गजानन लोखंडे
gaja.lokhande@gmail.com

4 comments:

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.