ओढ नव्या जीवाची - भाग २

तो खूप भारावून तिच्याकडे बघत होता. तिचे डोळे भरून आले होते आणि चालही मंदावली होती पण ती बोलतच होती..

"पण मला काळजी वाटते, जेव्हा ती थोडी मोठी झाल्यावर मला पुन्हा ऑफिसला जॉईन व्हावं लागेल त्याची. तेव्हा काय होईल? तिची इतकी सवय झाली असेल मला की तिला सोडून ऑफीसला जायला मनच तयार होणार नाही माझं. पाय नाही निघणार घरातून, ती पण माझा पदर नाही सोडणार. दिवसभर ती कशी राहील माझ्याशिवाय? वेळेवर दूध, खाणं, पिणं करेल की नाही? रडेल का खूप? आजीला त्रास तर नाही ना देणार? तू तर काय बाबा तिचे लाड करत राहणार आणि सगळं निस्तरावं लागेल मला. ए, अरे ऐकतोयस ना?"

इतका वेळ तिच्या बोलण्यात गुंतून पुढचं चित्र पहाण्यात दंग झालेला तो पटकन भानावर आला.

“अग हो, ती छोटी चिमणी डोळ्यासमोर आली बघ. आपण किती किती स्वप्न बघितली ह्या क्षणासाठी. ती आता पूर्ण होत आहेत. खूप श्रीमंत आहे मी आज ह्या जगात! खरंच पिल्लू, मी तिला आणि तुला खूप खूप जपेन. काही त्रास होऊ देणार नाही तुम्हा दोघांना. एक बाप म्हणून सर्व कर्तव्य पार पाडीन. मुलीचा जन्म हा जेवढा आनंद देणारा असतो तेव्हढच मनाला भिती, चिंता करायला लावणारा…”

"का रे, असं का बोलतोस?"

"अग, ती लहान असताना आपण असूच प्रत्येक क्षणी तिच्याबरोबर. पण ती थोडी मोठी झाल्यावर शाळा, कॉलेजला, क्लासला जायला लागल्यावर कसं होणार, त्याचीच भीती वाटते. एकटी ह्या जगात प्रवास करणार पंख पसरून… पण कोणी त्या पंखानाच इजा केली तर...आजकाल खूप अशा खूप बातम्या ऐकायला येतात... काय करणार, बापाच मन आहे गं..." अगदी हळवा होऊन बोलत होता तो.

"शूऽऽऽऽ..! खूप पुढचा विचार करतोयस तू शोना. असे प्रसंग घडले आहेत काही मुलींसोबत. ही भिती असतेच प्रत्येक मुलीच्या आई-वडिलांच्या मनात. त्यात काही गैरही नाही रे, पण तू शांत रहा."

"हो, पण या चिवचिव करणार्यार चिमण्या काही वर्षं आपल्या अंगणात राहून मग फुर्कन उडून जातात लग्न करून. एवढी माया लावून कश्या ह्या दूर जाऊ शकतात गं...?"

"ती चकीत होऊन त्याच्याकडे पहात होती. "ए वेड्या, अरे काय झालंय तुला? ती अजून या जगात आलीही नाहीये पण तू बापडा तिचं लग्नसुद्धा लावून मोकळा झालास? कठीण आहे तुझं! बरं, आपण घरी जाऊया का? मला दमल्यासारखं झालंय जरा. प्लीज?"

"हो चल ना, पाणी देऊ का तुला?” त्याने विचारता विचारता एका बाजूला तोंड फिरवून चटकन डोळे पुसून घेतले."

"पाणी तूच पी आणि हे प्रेम साठवून ठेव रे! आम्हाला तुझी खूप खूप गरज आहे." तिचेही डोळे नकळत भरून आले होते.

"मी कुठे जातोय तुम्हाला सोडून?”

तिने डोळे वटारून नुसतीच खूण केली की तो जे बोलला ते तिला अजिबात आवडलं नाही. त्यानेही मग डोळे मिटून तिला "सॉरी" म्हटलं.

चालता चालता अचानक तिने त्याचा हात मागे ओढत थांबवलं, “बाकी काही म्हण, तुझं माझ्यावर चं प्रेम कमी होणार हे नक्की! तुझ्या आवडीच्याच नावाने आपण तिला हाक मारू. "सई!" बरोबर ना? चालेल? तिने मान तिरकी करत त्याला विचारलं.

तो कौतुकाने तिच्याकडे पहात होता. "पिल्लू, तुझ्यावर प्रेम आहे म्हणूनच मी तिच्यावरही कायम प्रेमाची बरसात करत राहीन. शेवटी सईसुद्धा तुझाच तर एक भाग आहे. हो की नाही? त्याने तिचं नाक चिमटीत धरून हलवलं.

ती नुसतीच हसली. त्याने तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. दोघे आपल्या घराच्या दिशेने चिमुकली पाऊले टाकत चालू लागले.... नव्या जीवाच्या ओढीने!

समाप्त

--
सुहास झेले
suhas.zele@gmail.com

22 comments:

कृष्यणकुमार प्रधान १ नोव्हेंबर, २०१० रोजी ४:५४ AM  

दोन प्रेमी जीव व एक येणारा जीव यांचे प्रेमबंध डोळ्यांसमोर उभा करणारा उत्तम लेख

Suhas Diwakar Zele १ नोव्हेंबर, २०१० रोजी ९:४६ AM  

धन्यवाद काका आणि श्रेयाताय...

मुक्त कलंदर १ नोव्हेंबर, २०१० रोजी ११:१४ AM  

अतिशय आवडला.. बाबा आणि श्रेताशी शब्दश: सहमत..

अनामित,  १ नोव्हेंबर, २०१० रोजी ११:४१ AM  

दोन जीवांचा एक गोड अनुवाद आणि तिस-या जीवाची साद.. खूप छान.

mau १ नोव्हेंबर, २०१० रोजी ८:२३ PM  

surekh !!!!suhaas..khup chhan lihiles re....pratyek ol n ol..manala sparshun geli..chhan uttam !!

Snehal २ नोव्हेंबर, २०१० रोजी १०:०९ AM  

खूप छान सुहास दा खूपच छान लिहिले आहे किती छान नात आहे रे ह्यांचे

Suhas Diwakar Zele ४ नोव्हेंबर, २०१० रोजी १:४८ PM  

भारता, थॅंक्स रे...असाच एक प्रयत्‍न :)

Suhas Diwakar Zele ४ नोव्हेंबर, २०१० रोजी १:४९ PM  

@ तृप्ती, अगदी बरोबर नव्या जीवाची साद..खूप छान :)

Suhas Diwakar Zele ४ नोव्हेंबर, २०१० रोजी १:५१ PM  

माउ ताई, खूप छान वाटल तुझी प्रतिक्रिया वाचून आणि तू प्रत्यक्ष ईमेल करून मला पोस्ट आवडल्याच संगितलस खूप खूप छान वाटला...

Suhas Diwakar Zele ४ नोव्हेंबर, २०१० रोजी १:५४ PM  

व्हय सौरभ, लैई प्रेमळ हायेती दोघेही :)

Nisha ७ नोव्हेंबर, २०१० रोजी ९:४२ PM  

येणार्‍या बालाबद्दल विशेषतः मुलीबद्दल बाबाच्या मनात येणारे विचार आजवर फारच कमी वेळा व्यक्त झालेत. आता सुरूवात झाली आणि छान झाली . अभिनंदन.

Suhas Diwakar Zele ९ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:३० AM  

थॅंक्स निशाजी..एक प्रयत्‍न केला छोटा बस :)

THEPROPHET २९ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:४६ AM  

सुहासा,
मी वाचली पूर्वीच होती..मला वाटलं होतं मी दिलीय ऑलरेडी प्रतिक्रिया..पण आत्ता लक्षात आलं बराच उशीर केलाय प्रतिक्रियेला..तरी देतोय..
मला खूप आवडली..एकदम गोड कथा... :))

Suhas Diwakar Zele १० डिसेंबर, २०१० रोजी ७:३० AM  

भाई, थॅंक्स..दिवाळीला गोड लाडू अपर्णाच्या भाषेत ;)

अनामित,  १४ ऑक्टोबर, २०११ रोजी ३:५८ PM  

pharch chan agadi mala majya garodarpanachi athvan zali
pudhacha bhag vachayala nakki awadel

Suhas Diwakar Zele १५ ऑक्टोबर, २०११ रोजी ४:०१ AM  

धन्यवाद अनामिक... !!

पुढचा भाग लिहिला नाही अजुन.. बघू प्रयत्न करेन कधीतरी :) :)

अनामित,  ४ मे, २०१३ रोजी ११:१७ AM  

मस्त
मनाला आई होताना जो सुखद
अणुभाव असतो तो दिसून आला

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.